आरोग्यमहाराष्ट्रसोलापूर बातमी

सोलापूर जिल्हा रुग्णालयाचे एक पाऊल पुढे;अत्याधुनिक एक्स रे मशीनचे लोकार्पण…

जिल्हा रुग्णालयाने कात टाकली;अत्याधुनिक एक्स रे मशीन रुग्णांच्या सेवेत रुजू...

सोलापुरात जिल्हा रुग्णालयाचे उद्घाटन लोकसभा निवडणुकी अगोदर झाले.सोलापूर शहरातील गुरुनानक चौक परिसरात सुरू झालेल्या जिल्हा रुग्णालयाने कात टाकली आहे.अत्याधुनिक पद्धतीने एक्सरे मशीन रुग्णांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आली आहे.सोलापूर जिल्हा रुग्णालयात आलेला रुग्ण बाहेर जाता कामा नये यासाठी सार्वजनिक आरोग्य सेवा तत्पर झाली आहे.अत्याधुनिक एक्स रे मशीन रुग्णांच्या सेवे साठी उपलब्ध झाली आहे.जिल्हा रुग्णालयाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 300 एम.एच.मीडियम डी.आर.सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे.या एक्स रे मशीन मध्ये डिजिटल रेडिओग्राफीचा फायदा रुग्णांना होणार आहे.

अत्याधुनिक एक्स रे मशीनच्या सुविधा-
सोलापूर शहरातील जिल्हा रुग्णालय येथे 300 एम एच मिडीयम कंपनीची डी आर सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. एक्स रे मशीन म्हणजेच डिजिटल रेडिओग्राफी एक प्रकार आहे. ही मशीन रुग्णांच्या तपासणी दरम्यान थेट डेटा कॅप्चर करत एक्स-रे संवेदनशील प्लेट्स वापरतो. जुन्या पद्धतीने काम करत त्वरित संगणक प्रणालीवर डेटा हस्तांतरित केला जाऊ शकतो.या प्रक्रियेमध्ये वेळेची बचत होते, अधिक कार्यक्षमता व प्रभावी डिजिटल प्रतिमा हस्तांतरण व संग्रह करण्याची क्षमता अधिक प्रमाणात वाढवण्यात येते. तसेच डिजिटल रेडिओग्राफीमुळे सुस्पष्ट क्ष किरण प्रतिमा यामुळे आजाराची निदान लवकर होते व रुग्णांचा वेळही वाचतो.

*डिजिटल एक्सरे मशीन रुग्णांच्या सेवेत सुरू-
गुरुवारी 6 जून पासून डिजिटल एक्स रे मशीन कार्यान्वित करत रुग्णांसाठी उपलब्ध झाली आहे.हा लोकार्पण सोहळा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुहास माने,डॉ क्षीरसागर,डॉ एस.पी.कुलकर्णी,डॉ अनिल चव्हाण,डॉ रोहन वायचळ,एक्स रे टेक्निशियन इरफान जमादार,संदीप बनसोडे,श्रीमती बेले,जानराव,तारानाईक,भोसले,गावडे,स्नेहा गायकवाड,ब्रदर खान,सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel