सोलापूर बातमी

एस एस सर्विसेस मक्तेदाराकडून सर्व नियमा नियमांचे पायमल्ली सुरज-अनाधिकृत प्लांट मुळे लागली आग व पुन्हा सोलापुरातील कचरा कोल्हापुरात!

सोलापूर जिल्ह्यातील हॉस्पिटल मधील बायोमेडिकल वेस्ट कचरा गोळा करून भोगाव येथील ट्रीटमेंट प्लांटमध्ये विल पिले वाट लावण्यासाठी नियमबाह्य पद्धतीने एस एस सर्विसेस या मक्तेदारास महापालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी मक्ता दिलेला आहे. त्याचे गंभीर परिणाम सर्वसामान्य नागरिकांना भोगावे लागत आहेत. चार मे रोजी या प्लांटच्या चिमणी मधून मोठ्या प्रमाणात आगीच्या तिडक्या सभोवताली पडून पहाटेच आग लागली व ती आग सकाळपर्यंत स्मार्ट सिटीच्या पाईपच्या वेटोळ्यांना लागून मोठ्या प्रमाणात धुरीचे लोट आकाशात पसरू लागले होते तेव्हा महापालिकेच्या अग्निशामक दलाने हे आग आटोक्यात आणली होती परंतु मक्तेदाराने केलेल्या नुकसान पाठीशी घालण्यासाठी तत्कालीन अग्निशामक अधीक्षक केदार आवटे यांनी ही आग उन्हामुळे लागले असे सांगितले तसेच उपायुक्त आशिष लवकर यांनी या आगेमुळे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे सांगितले परंतु अशा प्रकारचे आग यादी दोनदा सुद्धा लागले होते व या आगेमुळे स्मार्ट सिटीच्या केबलचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे हे नुकसान महापालिका स्वतःच्या खिशातून भरून देणार का मग ते दाराकडून वसूल करणार?
या प्लांटमध्ये साठवून राहिलेला कचरा पुन्हा एकदा याचे सर्विसेसने अनधिकृत रीत्या कोल्हापूरला हलवला आहे यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे यांच्याकडे कोणतीही परवानगी नाही तसेच सोलापूर महानगरपालिकेतील कोणतेही अधिकारी अशा प्रकारचे परवानगी देऊ शकत नसतानाही महापालिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचे परवानगी कशी काय दिली व त्यावर त्यांच्या वरिष्ठांनी का कारवाई केली नाही? या सर्वांमागे बायोमेडिकल वेस्ट कचऱ्यामागे असलेल्या लाखो रुपयांच्या कमाईचे व भागीदारांचे गुपित दडलेले आहे. असा या काही भ्रष्ट लोकांनी सामान्य जनतेच्या आरोग्याचा खेळ मांडलेला असताना आता हा विषय माननीय जिल्हाधिकारी व प्रभारी आयुक्त कुमार आशीर्वाद यांच्याकडे आलेला आहे व आजच त्याबाबतचे बैठक त्यांनी घेतलेले आहे परंतु यामध्ये पुढे काय कारवाई होते व या भ्रष्टाचारामध्ये कोणा कोणाची नावे उघड होतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
डॉक्टर संदीप आडके.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia