सोलापूर नई जिंदगी येथील जागेचे बनवले खोटे कागदपत्र ; 2 जणांवर गुन्हा दाखल…
महापालिका हद्दवाढ भागातील मजरेवाडी येथील एक हजार स्क्वेअर फुट जागेची खोटी कागदपत्रे तयार करून विकली आणि अडीच लाखाची फसवणूक केली. याप्रकरणी दोघांवर एमआयडीसी पोलिसांत सोमवारी मध्यरात्री गुन्हा नोंद झाला आहे.
कादर हिरालाल शेख (वय ३७, रा. गोदुताई परूळेकर विडी घरकुल), मतीन म. रफीक शेख (रा. सिद्धेश्वर नगर भाग तीन नई जिंदगी) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी निदा बशीर कामले (वय २१, रा. सिध्देश्वर नगर भाग ३) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना २०२१ ते आजतागायत सत्यसाई नगरातील प्लॉट नंबर ३७२ याठिकाणी घडली आहे.
फिर्यादीची मजरेवाडी येथील जुना सर्व्हे नं २५३/ १ ब नवीन सर्व्हे नं ६५/ १ ब त्यापैकी सत्यसाई नगर प्लाट नं ३७२ हा प्लॉट आहे. हा एकुण एक हजार चौरस फुटांचा प्लॉट आहे. त्या जागेचे खोटे कागदपत्र तयार करून फिर्यादीचा विश्वास संपादन करून घेतला आहे. विश्वास संपादन क रून प्लांटची परस्पर खोटे कागदपत्रे तयार करून विक्री करत अडीच लाखाची फसवणूक केली आहे, असे फिर्यादमध्ये म्हटले आहे.