क्राईमसोलापूर अपघातसोलापूर क्राईमसोलापूर बातमी

सोलापूर- पुणे महामार्गावर भुईंजे गावाजवळ दुचाकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला धडकून एक पुरुष जागीच ठार

दिनांक ०९ जून २०२४ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर भुईंजे गावाजवळ टेंभुर्णी वरुन बैरागवाडीला जाताना दुचाकी क्रमांक MH 45 P 8821 रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला धडकून झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा डोक्याला मार लागून जागीच मृत्यू झाला असुन सदर अपघातात मृत्यू झालेल्या पुरुषाला वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिकेतून डॉ. गोरख लोंढे आणि रुग्णवाहिका चालक श्री सागर फाटे यांनी टेंभुर्णी येथील टेंभुर्णी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले असुन, सदर अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल नाका येथील रुग्णवाहिका पथक,मोडनिंब महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी श्री बालाजी साळुंखे साहेब (PSI)आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून या अपघातात मृत्यू झालेले व्यक्ती श्री वसंत माळी (माजी सरपंच बैरागवाडी) वय ५५ वर्षे रा.बैरागवाडी ता.माढा येथील रहिवासी आहेत . सदर अपघाताची माहिती टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्री तांबोळी साहेब आणि श्री माळी साहेब यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील डॉ गोरख लोंढे  यांनी दिली आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel