सोलापूर बातमीक्राईमजिल्हाधिकारी कार्यालय सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसोलापूर क्राईमसोलापूर सामाजिक
सोलापूर ब्रेकिंग | कुणबी जात प्रमाणपत्राच्या कागद पडताळणीसाठी मंडळ अधिकाऱ्यांनी मागितली एक हजार रुपयाची लाच…
सोलापूर – एकीकडे मराठा समाजासाठी मनोज जरंगे पाटील हे आंदोलनाला बसले आहे.तर दुसरीकडे कुणबी जात प्रमाणपत्राच्या अनुषंगाने प्राप्त कागदपत्राची पडताळणी करून अहवाल देण्याकरिता मंडळ अधिकारी यांनी तीन हजार रुपयाची लाचेची मागणी करून तळजोडी अंती एक हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्यास मान्य केले….
शंकर विठ्ठल केकाण – पद मंडळ अधिकारी नेमणूक मंडळ अधिकारी कार्यालय केतुर तहसील करमाळा असे लाच स्वीकारण्यास संमती दिलेल्या अधिकारी चे नाव आहे. करमाळा पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे….