सोलापूर महानगरपालिकामहाराष्ट्रसोलापूर बातमी

सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी केले गणरायाचे विसर्जन…

गणेशोत्सवानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली -उगले यांनी आपल्या निवासस्थानी आज गणरायाचा निरोप घेत पाचव्या दिवशी त्यांनी आपल्या परिवारासह घरातील पर्यावरण पूरक श्री गणेश मूर्तीचे विसर्जन आपल्या घरातच सर्व कुटुंबियांसमवेत केले. यावेळी महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली- उगले यांनी सर्व गणेश भक्तांना आवाहन केले की त्यांनीही पर्यावरण पूरक गणपती मूर्तीचे आपल्या घरातच विसर्जन करावे तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विसर्जनाच्या दिवशी विविध ठिकाणी संकलन केंद्र उभी करण्यात आली असून त्या ठिकाणी आपल्या घरातील श्री ची मूर्ती विसर्जनासाठी देऊन सहकार्य करावे तसेच आपण दिलेले श्री ची मूर्ती ही महापालिकेच्या वतीने विधिवत पूजा करून खाणीमध्ये विसर्जन करण्यात येईल.
एकूणच आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव साजरा करताना आपल्या हातून पर्यावरणाची हानी होणार नाही यासाठी सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज आहे असे आवाहन त्यांनी केले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel