सोलापूर | मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील महिला डॉक्टरने औषध पिऊन आत्महत्या…
सोलापूर | मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील महिला डॉक्टरने औषध पिऊन आत्महत्या केली.
शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात डॉ जयश्री प्रशांत गवळी (वय ३८)यांची आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. डॉ. जयश्री प्रशांत गवळी या त्यांच्या पेनुर येथील साई कृपा हॉस्पिटलमध्ये पती डॉ. प्रशांत केराप्पा गवळी यांच्यासोबत स्त्री रोग तज्ज्ञ म्हणून सेवा देत होत्या. गेल्या दहा ते बारा वर्षांपासून साईकृपा हॉस्पिटलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांना गवळी दाम्पत्य सेवा देत आहेत. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास डॉ. जयश्री गवळी या बेशुध्द अवस्थेत आढळून आल्या. त्यांना तातडीने पंढरपूर येथील लाईफ केअर हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेण्यात आले. उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत्यू घोषित केले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली व एक मुलगा आहे