क्राईमसोलापूर क्राईमसोलापूर बातमी

सोलापूर :राकेश राठोड ०२ वर्षांकरिता तडीपार

सोलापूर : महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत अनेक गुन्हे दाखल असलेल्या राकेश गुरुनाथ राठोड, वय-३३ वर्षे) याला पोलीस आयुक्तालय हद्द, उर्वरित सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्ह्यातून ०२ वर्षाकरीता तडीपार करण्यात आलंय.

राकेश राठोड याच्याविरुध्द सन २०१६, २०१७, २०१८, २०१९, २०२०, २०२१ व २०२३ या कालावधीमध्ये, महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत अनेक गुन्हे दाखल आहेत. राकेश हा अवैध हातभट्टी दारु विक्रीचा व्यवसाय करीत आला आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असल्या कारणाने एमआयडीसी पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ अन्वये त्याच्याविरुद्ध तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) यांना सादर करण्यात आला होता.

त्या प्रस्तावाचे अनुषंगाने पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे यांनी कार्यवाही करुन, त्यांचेकडील तडीपार आदेश क्र. १०७७/१८ एप्रिल २०२४ अन्वये राकेश राठोड ( रा. मुळेगांव लमाण तांडा, सोलापूर) यास सोलापूर व धाराशीव जिल्हा येथून दोन वर्षाकरीता तडीपार केलं आहे. त्यास तडीपार केल्यानंतर विजयपूर (कर्नाटक) येथे सोडण्यात आलं आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel