सोलापूर बातमी
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांना निवेदन ….
राज्यातून मुंबई येथे कामानिमित्त येणाऱ्या पत्रकार बांधवांसाठी आमदार निवासस्थान येथे व्यवस्था होण्याबाबत ….
लोकशाहीचा मजुबत स्तंभ म्हणजे पत्रकार . राज्यातील विविध ठिकानाहून हे पत्रकार बांधव मुंबईत येत असतात. मुंबईत आल्यानंतर या पत्रकारांसाठी स्वतंत्र निवास कक्ष विभागाची मुंबईत सोय नसल्याने त्यांची गैरसोय होते. पत्रकार बांधवांकडून आपल्या राष्ट्रवादी सोशल मीडिया सेल विभागाला निवास कक्षाची सोय होण्याबाबत सातत्याने मागणी होत आहे . या प्रश्नाबाबत दादा मी सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीने आपल्याकडे या बाबत निवेदन देत आहे. पत्रकार बांधवांची आमदार निवासस्थान येथे व्यवस्था व्हावी या आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचे शहराध्यक्ष वैभव गंगणे यांच्या वतीने अजित दादांना देण्यात आले.