सोलापूर बातमी

सोलापूर रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणाचे दर्शन घडवीत आपले कर्तव्य पार पाडले

आपल्या कर्तव्यावर कार्यरत असताना स्वतःमध्ये असणारा प्रामाणिकपणा दाखवत रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रवाश्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली आहे. त्याचीच प्रचिती म्हणुन रेल्वे कर्मचाऱ्यांनी समयसूचकता दाखवत प्रवाशाचा ऐवज मिळवून दिला आहे.
*महिला प्रवासी या ट्रेन क्रमांक 12116 सिद्धेश्वर एक्सप्रेस ने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर या गाडीने H1-F कूपा सीट क्रमांक 15 वर प्रवास करत होत्या. सोलापूर रेल्वे स्थानकावर उतरत असताना त्यांची बॅग सीटवरच विसरली. कर्तव्यावर स्थित असणाऱ्या सोलापूर रेल्वे विभागातील कर्मचारी H1 कोचचे AC कोच अटेंडंट (ACCA) श्री.महेश येमुल यांना ती मिळाली. त्यांनी ती बॅग वरिष्ठ विभागीय यांत्रिकी अभियंता श्री रामलाला प्यासे व वरिष्ठ खंड अभियंता कॅरेज अँड वेगन / डेपो इनचार्ज/ सोलापूर आणि ज्युनिअर यांच्या उपस्थितीत संबंधित महिला प्रवासी यांना परत केली. त्या पर्स मध्ये रोख रक्कम 30,000/- आणि आयडी कार्ड होते.

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रती आपली क्रुतज्ञता व्यक्त करीत महिला प्रवासी यांनी सर्व टीमचे आभार मानले.

यावेळी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे वरिष्ठ विभागीय यांत्रिकी अभियंता श्री रामलाला प्यासे यांच्याकडून या सर्व कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात आले.
——-
दिनांक 17 ऑगस्ट, 2024.
PR क्रमांक 2024/08/13
जनसंपर्क विभाग, मध्य रेल्वे, सोलापूर विभाग यांनी हे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel