सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातून ३५ हजारांची दुचाकी लंपास!

सोलापूर, दि. २१ – सोलापूर शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून चोरट्यांनी आता रेल्वे स्टेशनसारख्या गजबजलेल्या ठिकाणालाही लक्ष्य केले आहे. भरदिवसा हँडल लॉक केलेली गाडी लबाड चोरट्याने लंपास केल्याची घटना सदर बझार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
१) गुन्हा :-
सदर बझार पोलीस ठाणे, सोलापूर
गु.र.नं. ९०४/२०२६ – भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे (चोरी)
२) घटना (वेळ व ठिकाण) :-
दि. १०/०९/२०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ०२.०० वा. चे सुमारास
ठिकाण – रनिंग रूम, रेल्वे स्टेशन, सोलापूर
३) फिर्यादी :-
विश्वनाथ बाबू राठोड, वय ५४ वर्षे, रा. ४६ अश्विनी कॉलनी, एस.आर.पी. कॅम्पच्या पाठीमागे, सोलापूर
४) आरोपी :-
अज्ञात लबाड चोरटा
५) गेला माल :-
३५,०००/- रु. किमतीची हिरो कंपनीची एच.एफ. डिलक्स मोटारसायकल क्र. MH १३ CC ५२०८
६) हकीकत :-
यातील फिर्यादी विश्वनाथ राठोड यांनी आपली मोटारसायकल वरील ठिकाणी हँडल लॉक करून ठेवली होती. त्याचवेळी संधी साधून दबा धरून बसलेल्या अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीवाचून मुद्दाम लबाडीच्या इराद्याने दुचाकी चोरून नेली आहे.
घरासमोर नाही तर थेट रेल्वे स्टेशनसारख्या वर्दळीच्या ठिकाणाहून गाडी चोरीला गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
७) तपास :-
या प्रकरणी सदर बझार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोहे.कॉ. १०९/देवकते हे करीत आहेत.
गुन्हा दाखल वेळ – दि. २१/१०/२०२६ रोजी दु. ०१.०२ वा.



