सोलापुरात बाप-लेकीचा महाठगपणा – कर्जबाजारी घर 10 लाखात विकून फसवणूक, गुन्हा दाखल!

सोलापूर : विश्वास संपादन करून घर विक्रीच्या नावाखाली १० लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या भामट्या पिता-पुत्रीविरोधात जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
जोडभावी पेठ पोलीस ठाणे – गु.र.नं. ७९७/२०२६, भा. न्या. सं. कलम ३१६(२), ३१८(४), ३(५) प्रमाणे गुन्हा.
फिर्यादी :- अंबुश दिगंबर कुंटला, रा. इंदिरा नगर, नळदुर्ग, धाराशिव
आरोपी :- १) रजनी सुभाष तंबाके, २) कल्पेश सुभाष तंबाके
संतापजनक हकीकत अशी की –
दि. ०१/०२/२०२४ ते २२/१०/२०२६ दरम्यान, मेहता नगर, दहिटणे, सोलापूर येथे आरोपीतांनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
फिर्यादीचे वैयक्तीक तसेच घरावरील कर्जाची परतफेड करण्याकरिता त्यांचे प्लॉट नं. ४४, सर्वे नं. ३४/२, मेहता नगर, दहिटणे येथील घरावर ज्ञानदिप फायनान्स व शिवकृपा पतपेढी, मुंबई यांचे कर्जाचा बोजा व जप्ती आली असतानाही सदरची अत्यंत महत्वाची माहिती फिर्यादीस न देता लपवून ठेवली.
कर्जबाजारी आणि जप्ती आलेले घर असल्याचे माहित असूनही आरोपींनी सदरचे घर फिर्यादीस विक्री करून त्याबदल्यात १० लाख रुपये घेऊन सदर पैसे परत न करता त्याचा अपहार केला आणि फिर्यादीची पुरती फसवणूक केली.
एखाद्याच्या आयुष्यभराच्या कमाईतून घेतलेले घर अशा पद्धतीने कर्जाचा बोजा लपवून विकणे हा अत्यंत निर्लज्ज आणि फसवा प्रकार असून या लबाड आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
तपास :- सपोनि/जगताप- हे करीत आहेत.



