सोलापूर विकास मंचच्या सदस्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट; सर्व मुद्द्यांवर तात्काळ कार्यवाहीचे आश्वासन
सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पावसाळी अधिवेशनात भेट घेतली आणि सोलापूर शहराच्या विकासासाठी महत्वाच्या मागण्या केल्या. फडणवीस यांनी सर्व मुद्द्यांवर तात्काळ कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे
हिप्परगा तलावाच्या गाळमुक्तीसाठी आश्वासन
सोलापूर शहराला पाण्याचा नियमित पुरवठा होण्यासाठी हिप्परगा तलावाची गाळ मुक्तीचे महत्त्व विशद करुन दिले.
परिवहन सेवेत सुधारणा आवश्यक
सोलापूर शहरासाठी परिवहन सेवेसाठी सोलापूर शहरात ई-बसेस ऐवजी सी.एन.जी. मिडी बसेस उपयुक्त ठरतील, असे मंचने रस्ताची रुंदी व वळणाचा अभ्यास करुन सांगितले.
स्मार्ट सिटी योजनेचे फॉरेन्सिक ऑडिट
सोलापूर शहरात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत एक हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत, परंतु कामे व्यवस्थित झालेली नाहीत. या कामांचा कॅगद्वारे फॉरेन्सिक ऑडिट करून तपासणी करण्याची मागणी मंचने केली आहे.
युवा वर्ग विस्थापित होऊ नये ह्या करिता प्रयत्न आवश्यक
गेल्या १० वर्षांत ४ लाख युवक सोलापूर सोडून गेले आहेत. शहरात आयटी आणि इंजिनिअरिंग उद्योग आणण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होणे अत्यावश्यक असल्याचे मंचने सांगितले.
बाह्यवळण रस्त्याची निर्माण त्वरित व्हावे
सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ते सोरेगाव हा ५४ मीटर बाह्यवळण रस्ताचा निर्माण तातडीने पूर्ण करावे अशी मागणीही मंचने केली आहे.
वरील सर्व मुद्दां बाबत सविस्तर माहिती मंच सदस्यांकडून घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन मंचच्या सदस्यांना दिले. सोलापूर विकास मंचने देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेतल्यामुळे सोलापूरच्या विकासकामांमध्ये लवकरच प्रगती होईल अशी अपेक्षा आहे. ह्यावेळी सोलापूर विकास मंचचे सदस्य योगिन गुर्जर, विजय कुंदन जाधव, महेश डोईजोडे, रोहित मोरे माजी आमदार डेसमेंड येट्स आदी मान्यवर उपस्थित होते.