सोलापूर बातमीसोलापूर सामाजिक

सोलापूर विद्यापीठ ग्रंथालयात माजी मुख्यमंत्री डॉ.सुशीलकुमार शिंदे यांच्या जीवनचरित्र्यावरील विविध पुस्तके वाचण्यासाठी विद्यार्थ्यांना उपलब्ध…

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ ज्ञानस्त्रोत केंद्रात सोलापूरचे सुपुत्र महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व सोलापूर विद्यापीठाचे निर्माते डॉ.सुशीलकुमार शिंदे यांच्या संघर्षमय जीवनचरित्र्यावरील विविध पुस्तके विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी उपलब्ध होण्यासाठी सिनेट सदस्य,सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रकाश महानवार,प्रकुलगुरू डॉ लक्ष्मीकांत दामा,कुलसचिव योगिनी घारे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

कोर्टातील पट्टेवाला ते देशाचा गृहमंत्रीचा प्रवास राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,क्रिडा,सांस्कृतिक अशा विविध कलेचे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले सुशीलकुमार शिंदे यांचे संघर्षमय कहाणी या विविध पुस्तकातून विद्यार्थ्यांना वाचायला मिळणार आहे.विद्यार्थ्यांना भविष्यात स्वतःच्या जीवनात कलाटणी देऊन उंच भरारी कशा पद्धतीने घेतली पाहीजे हे या संघर्षमय पुस्तकातून वाचायला मिळणार आहे.

सुशीलकुमार शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना देशातील स्वतंत्र जिल्हयासाठीचे एकमेव विद्यापीठ सोलापूरसाठी 2004 साली 519 एकर जमीन असलेले जागा मंजूर करुन घेतले. सोलापूर जिल्ह्यातील लाखों विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कोल्हापूरला जावे लागत होते.पंरतु आज शिंदे यांच्या मुळे सोलापुरातच पुर्ण शिक्षण मिळत आहे.व विद्यापीठात हजारो लोकांना रोजगार मिळाला.आज या विद्यापीठाला पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असे ओळखले जाते.महाराष्ट्राचा मुख्यमंत्री,अर्थमंत्री,कामगारमंत्री,राज्याचे राज्यपाल,देशाचे ऊर्जामंत्री,गृहमंत्री,लोकसभा नेता अशा विविध पदांवर काम करणार्‍या डॉ.सुशीलकुमार शिंदे यांचे संघर्षमय जीवनचरित्र पुस्तके विद्यार्थ्यांना वाचण्याठी जास्तीत जास्त प्रती ग्रंथालयात उपलब्ध करून देण्याची ग्वाही प्रकुलगुरू डॉ.दामा यांनी दिली.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel