सोलापूर बातमीजिल्हाधिकारी कार्यालय सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसोलापूर महानगरपालिकासोलापूर राजकीय

सोलापूर विभागातील ५३३ एसटी बसेसचा विधानसभा निवडणुकीसाठी झाला वापर…

राज्याच्या नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ५३३ एसटी बसेस राखीव करण्यात आल्या होत्या. या बस गाड्यांच्या प्रवासी भाड्यापोटी महामंडळाला शासनाकडून दोन कोटी दहा लाख ८९ हजार २३० रुपये मिळणार असल्याची माहिती सोलापूर एसटी विभागाचे विभाग नियंत्रक अम ोल गोंजारी यांनी दिली आहे. यामुळे एसटीच्या उत्पन्नात कोटींची भर पडणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (दि. २०) मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणूक कर्तव्यावरील संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना विधानसभा मतदारसंघात नेऊन सोडणे व मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर परत त्यांना त्यांच्या विधानसभा मतदारसंघात घेऊन येण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) सोलापूर विभागाकडून ५३३ एसटीची व्यवस्था केली होती. बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅड व इतर साहित्याची ने-आण करणे, तसेच कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर पोहोचवून सर्व साहित्यसह परत घेऊन येण्यासाठी एसटी बसेसची व्यवस्था केली होती.

याप्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या सर्व बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन एसटी महामंडळाकडून करण्यात आले होते. यासाठी सोलापूरसह अन्य आठ आगारातून तसेच विभागीय कार्यालय येथून दोन दिवसांसाठी राखीव बसेस ठेवण्यात आल्या होत्या. निवडणूक कामकाजासाठी एसटीच्या बस सर्व राखीव ठेवल्याने नियमित प्रवासी वाहतूक प्रभावित झाली होती.

दरम्यान निवडणूक आटोपल्यानंतर सर्वच आगारातील प्रवासी वाहतूक सुरळीत झाली आहे. पोलीस अधीक्षक – सोलापूर ग्रामीण यांच्याकडे होमगार्ड कर्नाटक राज्य येथून ४२ गाड्यांची मागणी केली होती. यातून ४० लाखांचे तर तर पोलिस अंमलदार • वाहतूक सोलापूर जिल्हा यांनी २३ बसेसची मागणी केली होती यातून सहा लाख ४८ हज़ार २ रुपये उत्पन्न मिळाले आहे

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel