सोलापूर बातमीशैक्षणिक

सोलापूर शहरातील झोपडपट्टीमध्ये राहत असलेल्या कु.अल्फीया मुस्तफा पठाण हिस Neet Exam.मध्ये 617 गुण

सोलापूर शहरातील झोपडपट्टीमध्ये राहत असलेल्या कु.अल्फीया मुस्तफा पठाण हिस Neet Exam.मध्ये 617 गुण मिळालेत.वडील भाजीपाला विकतात,सदर मुलीला MBBS डॉक्टर होण्याची इच्छा आहे.सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. मा.मंत्री महोदयांनी आणि मा.MD साहेबांनी दखल घेऊन सदर मुलीची व पालकांची भेट घेणेसाठी कळविले.त्यानुसार आम्ही प्रत्यक्ष घरी जाऊन तिचा शाल,पुष्पगुछ देऊन व पेढा भरवून अभिनंदन केले, चर्चा केली,तिचे यश खरोखरचं कौतुकास्पद आहे.
तिची डॉक्टर होण्याची इच्छा आहे,तिला पुढील उच्च शिक्षणसाठी मौलाना आझाद महामंडळ कर्ज देण्यासाठी तयार असल्याचे सांगितले आणि त्या मुलींचे आणि श्री.G.P.मगदूम साहेब यांचे फोनवरून संभाषण करून दिले.निधीअभावी तिच्या शिक्षणात खंड पडणार नाही असा शब्द यावेळी त्या गरीब कुटूंबाला देण्यात आला, याप्रसंगी सोलापूर जिल्हा व्यवस्थापक चाँदमिया आ. बिराजदार, सहाय्यक सौ.रफिया हुंडेकरी,पालक मुस्तफा पठाण,आजोबा (नाना )जिलानी शेख, इर्शाद मोमीन, छोटा भाऊ अब्रार पठाण आदी यावेळी उपस्थित होते,MbbS ला प्रवेश निश्चित झाल्यानंतर संपर्क साधणार असल्याचे पालकांनी सांगितले. महामंडळकडून सन्मान करण्यात आल्यामुळे ते कुटुंबीय भारावून गेले आणि त्यांनी आभारही व्यक्त केले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel