सोलापूर शहरातील धोकादायक प्रदूषणामुळे शहरात संसर्गजन्य रोगराई पसरली आहे म्हणून प्रदूषण दूर करण्यासाठी युद्ध पातळीवर उपाय करा
सोलापूर शहरातील नागरिकांचे दूषित प्रदूषणामुळे जिव धोक्यात आले व येत आहे. त्याचबरोबर मनपा प्रशासन शहरवासीयांना मूलभूत गरजा पुरविण्यात निष्क्रिय ठरले आहे. त्यामुळे विविध साथीरोग होत आहेत. त्याचबरोबर दिवाबत्ती आरोग्य विषयक उपाय, स्वच्छता मोहीम अशा विविध महत्त्वाच्या पुरविण्याचे नियोजन नाही या सर्व गंभीर समस्या 31 डिसेंबर पर्यंत युद्धपातळीवर उपायकरा अन्यथा मी सोलापूर समितीच्या वतीने 1 जानेवारी 2025 या नववर्ष रोजी मनपा आयुक्तांना घेराव घालण्यात येईल असा इशारामी सोलापूर माझे सोलापूर समीतीचे निमंत्रक विष्णु कारमपूरी (महाराज) यांनी दिली आहे.
मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समितीच्या वतीने11डिसेंबर रोजी विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेवर धडक मोहिमेद्वारे मनपा आयुक्तांना 16 मागण्यांचे निवेदन देण्यात आले नागरिक बंधू भगिनींनी यावेळी सोलापुरातील धोकादायक आरोग्य प्रदूषण त्वरित दूर करा, दररोज नियमित पाणीपुरवठा करा, मनपा प्रशासनाचा अधिकार असो, मनपा आयुक्तांचा धिक्कार असो, मी सोलापूर माझे सोलापूर समितीचा विजय असो अशा घोषणा दिल्या त्यानंतर मनपा आरोग्य अतिरिक्त आयुक्त श्री पवार साहेब यांना निवेदन देण्यात आले.
सदर प्रसंगी विष्णू कारमपुरी (महाराज), अतुल कोटा, पत्रकार वामन निंबाळकर, विठ्ठल कुराडकर, विश्वनाथ राठोड, लक्ष्मीबाई ईप्पा, रेखा आडकी प्रभाकर मुनक्याल प्रशांत जक्का, गोवर्धन मुद्गल गुरुनाथ कोळी शिवा ढोकळे, रफिक शेख, श्रीनिवास बोगा, मानवाधिकार समितीचे सादिक शेख, डालीमार,रऊफ नाकेदार,अकबर शेख, अझर विजापुरे रहमत शेख, ईलाही शेख, पत्रकार प्रसाद जगताप, सविता दासरी, पद्मा सामल,माधवी गावडा, जाहेदा शेख, निलाबाई काडगी, यल्लमा माचरला,लक्ष्मी गणपा, बालकिसन गोणे, व मोठ्या संख्येने नागरीक बंधू-भगिनी उपस्थित होते
निवेदनातील 16 मागण्या 1) शेरवाशी यांच्या आरोग्याचे धोका विविध आरोग्यसेवेचे उपाय करा 2) संपूर्ण शहरात जंतुनाशक औषधाचे फवारणी करा 3) संपूर्ण शहरात आरोग्य शिबिरांचे आयोजन करा 4) घरोघरी औषधोपचारची पुरवठा करा 5) सार्वजनिक ठिकाणी आरोग्य केंद्र चालू करा 6) आरोग्य विषयक जनजागृती अभियान राबवा 7) ड्रेनेज वारंवार थांबणारे त्वरित दुरुस्ती करा 8) खुले असलेले देण्याचे झाकण दुरुस्ती करा 9) मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा 10) मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा 11) भागवत बगीचे दुरुस्ती करून नागरिकांसाठी खुले करा 12) सार्वजनिक शौचालय व संडास वारंवार स्वच्छता करा13) पाळीव कुत्र्यांच्या मालकांना नियमांचे पालन करण्याचे आदेश द्यावेत 14) आज वाढ भागातील दूरदर्शन दूर करा 15) शहरातील सर्वच रस्ते स्वच्छता मोहीम राबवा 16) प्रदूषण मुक्त करण्यासाठी उपाय करा
फोटो मॅटर
**********
मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने म न पा आरोग्य अतिरिक्त आयुक्त श्री पवार साहेब यांना निवेदन देताना विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिक बंधू भगिनी दिसत आहे