सोलापूर शहर हददीत दुचाकी वाहन चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगारासपोलीसांनी केली अटक …
मा. पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, मा. पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर गा. सहा. पो. आयुक्त (विभाग १) सोलापूर शहर यांनी सोलापूर शहर हददीत दुचाकी वाहन चोरीच्या घडणाऱ्या गुन्हयाबाबत प्रकर्षाने लक्ष केंद्रीत करुन दुचाकी चोरणाऱ्या आरोपीतांविरुध्द कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. या अनुषंगाने जेलरोड पोलीस ठाणे कडील व.पो.नि. श्री. अरविंद माने साो. यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व कर्मचारी यांची बैठक बोलावून पथक प्रमूख स.पो.नि. निलेश पाटील- सोनवणे यांना मार्गदर्शन करुन सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने दुचाकी वाहन चोरी रोखण्याकरीता पोलीस ठाणे हददीतील नेहमी चोऱ्या होतात अशी ठिकाणे तसेब रात्रीच्या वेळेस सतत गस्त करुन ठिकठिकाणी सापळा लावण्यात येत होता त्याचप्रमाणे गुप्त बातमीदाराकडुन माहीती काढण्यात येत होती. तसेच गाडया चोरीस गेलेले घटनास्थळ येथील सीसीटीव्ही फुटेज चेक करणे व सदर ठिकाणचा तांत्रीक तपासाचे आधारे तपास असे वेगवेगळे प्रयत्न जेलरोड गुन्हे प्रकटीकरण पथकाकडुन करण्यात येत होते. दिनांक ०५-०७-२०२४ चे २३.०० ते दि. ०६-०७-२०२४ चे ०५.०० वा. पर्यंत कोंबीग ऑपरेशन दरम्यान स.पो.नि./सोनवणे यांना गुप्त बातमीदाराकडुन खात्रीशिर बातमी मिळाली की, एक २२ ते २५ वयाचा इसम त्याने अंगामध्ये चॉकलेटी टि-शर्ट घातलेला असुन त्यांने चोरी केलेली एक हिरो कंपनीची होन्डा ट्बुस्टर कंपनीची काळ्या रंगाची मोटार सायकल घेऊन तो अक्कलकोट येथील पद्मशाली स्मशानभुमी जवळ येणार असल्याची बातमी मिळाल्याने स.पो.नि./सोनवणे यांनी सदर बातमीची खातरजमा करणे करीता ते व त्याचे पथकातील सहा. फौ. कणगीरी, पोहवा/४४ शेख, पोहया/१२५० घुमाळ, पोना/१३११ बाबर, पोकों/१३८३ इंगळे, पोकॉ/१४७७ सिनारे, पोकॉ/१४७५ देकाणे, पोकॉ/९८९ वायदंडे, पोकों / ८८८ सांवत असे मिळुन स्टेशन डायरी नोंद करुन रवाना झाले होते. स.पो.नि./ सोनवणे व त्यांचे पथकातील वरील पोलीस अंमलदांरानी सापळा रचुन सदर ठिकाणी थांबले असता, तेथे एक इसम काही वेळात एक लाल व काळ्या रंगाची होन्डा टबुस्टर दुचाकीवर पद्मशाली स्मशानभुमीच्या पाठिमागे येत असताना त्यास आम्ही थांबवुन त्यांनी विचारपुस करीता असताना तो गडबडुन गेला व त्याचे ताब्यातील वाहन तेथेच सोडुन पळून जावु लागल्याने स.पो.नि./सोनवणे व त्यांचे पथकाने शितापतीने सदर इसमास पकडले. त्यांचे ताबेतील दुचाकीची पाहणी केली असता सदर गाडी ही होन्डा ट्बुस्टर कंपनीची दुचाकी होती, तिया क्रमाक MH-१३-BA-०७५९ असा असल्याचे दिसुन आले. सदर इसमास त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव सैफ इरफान यादगिर वय २४ वर्षे रा. घर नं. १३३/३ क विभाग, नविन विडी घरकुल कुंभारी सोलापुर मो.न. ८०१०५५२५१० असे असल्याचे सांगितले. त्यांचे कडे सदर गाडी बाबत अधिक चौकशी केली असता, त्याने सदरची गाडी ही दि ०१/०७/२०२४ रोजी दुपारी ०५.१५ वा चे सुमारास जुने वालचंद कॉलेज येथील पार्किंग मधुन चोरी केल्याचे सांगितले. सदर आरोपी यास विश्वासात घेऊन त्यांने अन्य कोठे गुन्हे केले आहेत का याबाबत विचारणा केली असता त्याने दि. १९-०६-२०२४ रोजी रात्रौ ०२.०० वा. चे सुमारास खाजा नगर ता. जि. पाराशिव येथुन एक हिरो Hunk कपनीची दुचाकी, दि. २९-०६-२०२४ रोजी रात्री ११.४५ वा. चे सुमारास बुर्ला कॉलेज जवळ घराजवळील असलेली एक पेंशन प्रो कंपनीची गाडी, तसेच दि. ३०-०६-२०२४ रोजी दुपारी ०४.०० वा. वे सुमारास जिजामाता हॉस्पीटल समोरील बागेजवळ लावलेली बजाज डिसकव्हर या गाड्या चोरी केल्याचे सांगितले. स.पो.नि./सोनवणे यांनी त्यास सदरचे गाडया कोठे ठेवलेले आहेत याबाबत विचारणा केले नंतर त्याने सदरच्या गाड्या ह्या पद्मशाली स्मशानभूमीच्या भिंती लगत झुडपामध्ये लपवून ठेवलेली असुन त्यांचे ताबेतील होन्डा ट्यूस्टर कंपनीची दुचाकी ही देखील तेथेच लपविण्या करीता आलो असल्याबाबत सांगितले. त्याची सांगितलेली हकिकत ऐकुन स.पो.नि./ सोनवणे व त्यांचे पथकाने पंच इसमांना बोलावुन त्यावे समक्ष चोरी केलेल्या गाढया कोठे आहेत असे आरोपीस विचारले असता आरोपीने स.पो.नि./सोनवणे त्यांचे पथक व पंचाना वर नमुद गाडयाजवळ घेऊन गेला. पद्मशाली स्मशानभुमीच्या मिती लगत झुडपामध्ये आरोपीने लपवुन ठेवलेल्या होत्या, सदर गाडयाची पाहणी केली असता या अनुषंगाने दूचाकी वाहनाचे चेसीस क्रमांक व जेलरोड पोलीस ठाणेकडील अभिलेख तपासले असता सदर वाहन चोरीस गेलेबाबत जेलरोड पोलीस ठाणेस १. ३३२/२०२४ BNS कलम ३०३ (२). २. ३३३/२०२४. ३. ३३५/२०२४ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल होते. तसेच आरोपीने धाराशिव जिल्ह्यात देखील वाहनांची चोरी केल्याने धाराशिव शहर पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. २७४/२०२४ मा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे समजले आहे. सदर आरोपी कडुन सदर ४ गुन्ह्यातील चारही वाहने जप्त करण्यात आलेली असून सदर वाहने चोरीस गेले बाबत खालील प्रमाणे गुन्हे दाखल असुन ते उघडकीस आलेले आहेत.
१. जेलरोड पोलीस ठाणे गु.र.क्र. ३३२/२०२४ BNS कलम ३०३ (२) यामध्ये ५०,०००/- रुपये किंमतीची एक होन्डा ट्युस्टर कंपनीची मोटार सायकल
२. जेलरोड पोलीस ठाणे गु.र.क्र. ३३३/२०२४ मा.द.वि. कलम ३७९ यामध्ये ४०,०००/- रुपये किंमतीची एक पेंशन प्रो कंपनीची मोटार सायकल
३. जेलरोड पोलीस ठाणे गु.र.क्र. ३३५/२०२४ भा.द.वि. कलम ३७९ यामध्ये ३५,०००/- रुपये किंमतीची एक बजाज डिसकव्हर कंपनीची मोटार सायकल
४. धाराशिव पोलीस ठाणे गु.र.क्र. २७४/२०२४ भा.द.वि. कलम ३७९ यामध्ये २५,०००/- रुपये किंमतीची एक हिरो Hunk कंपनीची मोटार सायकल
१,५०,०००/- रूपये किंमतीचे वाहनांबाबत दाखल असलेले गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
सदरची कामगिरी
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. एम राजकुमार साो, मा. पोलीस उप-आयुक्त श्री. विजय कबाडे साो (परिमंडळ), मा. सहा. पोलीस आयुक्त विभाग-१ श्री. तोरडमल साो, यांचे मार्गदर्शनाखाली व.पो.नि. श्री. अरविंद, पो.नि.श्री. भाऊराव बिराजदार (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमूख स.पो.नि. निलेश पाटील- सोनवणे सहा. फौ. कणगीरी, सहा. फौ. शेख, पोहवा/४४ शेख, पोहवा /१२५० धुमाळ, पोना/१३११ बाबर, पोकॉ/१३८३ इंगळे, पोकों/१४७७ सिनारे, पोकॉ/१४७५ देकाणे, पोकॉ/९८९ वायदंडे, पोकों/८८८ सांवत, पोशि/१९३९ जाधव, पोकॉ/१७७५ यसलवाड यांनी पार पाडली आहे