सोलापूर बातमीsolapurpoliceमहाराष्ट्रसोलापूर क्राईम
सोलापूर – श्रीनिवास सांगावर गुन्हा दाखल….

कोर्टात केसबाबत जबाब देण्यासाठी जात असताना ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी शिंदेसेनेचे नगरसेवक पदाचे उमेदवार उभारलेले श्रीनिवास किशोर संगा (रा. विजय नगर, ७० फुट रोड) याच्यावर जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी मेघना मधुकर पुठ्ठा (वय २९, रा. गोदूताई विडी घरकूल) यांनी गुरुवारी रात्री फिर्याद दिली आहे. फिर्यादी मेघना या पतीसोबत कोर्ट परिसरात कोर्टात जबाब देण्यासाठी जात होत्या. तेव्हा आरोपी संगा याने कोर्ट परिसरातील रस्त्यावर अडवून त्यांना अक्षय याच्याविरुद्ध दिलेली तक्रार मागे घे व जबाब देऊ नको म्हणून फिर्यादी व तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी दिली. तसेच शिवीगाळ केली असे फिर्यादीत म्हटले आहे…



