सोलापूर- सर्व विडी कंपनीच्या शाखांमध्ये जनजागृती करणार – विष्णु कारमपुरी (महाराज)
प्रा.फंड व पेन्शन लाभासाठी दलालांना रोखा. साबळे वाघीरे कंपनीला कामगार सेनेचे निवेदन.

विडी उद्योगात काम करणाऱ्या महिला कामगारांचे प्रा.फंड व पेन्शन लाभार्थींचे खाजगी दलालांकडून फसवणुक होत आहे. म्हणून आपल्या विडी कंपनीतील कर्मचाऱ्यांना याबाबत सुचना द्या आणि महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सर्व विडी शाखा मध्ये जनजागृती अभियान राबविणार असल्याचे माहिती कारमपुरी (महाराज) यांनी प्रसिध्दी पत्रकात दिली आहे.
साबळे वाघीरे कंपनीचे व्यवस्थापक बाळासाहेब जगदाळे यांना दिलेल्या निवेदनात वरील विषयास अनुसरून विनंती करण्यात येते की, आपल्या विडी कंपनीत काम करणाऱ्या महिला विडी कामगार रिटायर झाले किंवा स्वेच्छा निवृत्ती (राजीनामा) दिलेल्या कामगारांना केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या प्रा.फंड विभागाकडून पेन्शन व प्रा.फंड मिळतो. या कामगारासाठी आपल्या कंपनीकडून नेमणूक केलेल्या प्रा.फंड सल्लागार काम पाहतात. असे असतांना कंपनीतील कर्मचारी, ब्रँच मॅनेजर, चेकर, पानवाला, तंबाखूवाला व इतर कर्मचारी त्यांच्या हितसंबंधीत असलेल्या माणसाकडे महिला कामगारांना जाण्यास सांगतात. यामुळे विडी कामगारांची आर्थिक लुबाडणुक होत आहे.
तरी माननीयांना विनंती की, आपल्या कंपनीतील ब्रँच कर्मचाऱ्यांकडून होणारा असे गैरप्रकार थांबवून विडी कामगारांचे होणारे आर्थिक नुकसान थांबवावे ही विनंती. असे नमूद केले आहे.
साबळे वगैरे विडी कंपनीच्या व्यवस्थापक श्री जगदाळे यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात विष्णू कारमपुरी (महाराज), रेखाताई आडकी, विठ्ठल कुराडकर, गुरुनाथ कोळी, गणेश मंता, श्रीधर आडकी.आदींचा समावेश होता
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने प्रां. फंड व पेन्शन चा लाभ घेणाऱ्या महिला विडी कामगारांची फसवणूक होऊ नये याबाबत शाखेतील कर्मचाऱ्यांना सूचना द्यावेत अशा मागणीचे निवेदन कंपनी व्यवस्थापक श्री जगदाळे यांना देताना विष्णू कारमपुरी (महाराज) रेखाताई आडकी, विठ्ठल कुराडकर, गणेश म्हंता ,श्रीधर आडकी, आधी दिसत आहेत



