न्यायालय निर्णयसोलापूर बातमी

सोलापूर :सुनेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासू सासऱ्यास मुंबई उच्च न्यायालयातुन जामीन मंजूर

काजल अण्णासाहेब मोरे हिस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासू अलका सिद्धेश्वर मोरे वय:- 50,सासरा सिद्धेश्वर मारुती मोरे वय:- 60,दोघे रा- ढवळस ता:- मंगळवेढा, जि:- सोलापूर यांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम.जे.जमादार यांनी जामीन मंजूर केला.

यात हकीकत अशी की, काजल हिचे 2021 मध्ये आरोपी अण्णासाहेब याच्यासोबत लग्न झाले होते.लग्नानंतर सासू सासरे पती नणंद हे तिस लग्नामध्ये मानपान नीट केला नाही तसेच माहेरहून 10 तोळे सोने घेऊन ये म्हणून तिस जाचहाट करीत होते तसेच तिस उपाशी पोटी ठेऊन शिविगाळ व मारहाण करीत होते.
तसेच माहेरहून नवीन गाळ्याच्या बांधकामासाठी 10 लाख रुपये घेऊन ये म्हणून तिस त्रास देत होते. त्यावेळी तिच्या घरच्यांनी 5 लाख रुपये दिले, राहिलेल्या 5 लाखासाठी सासर कडील सर्व लोक हे तिस जाचहाट करीत होते,सदरच्या जाचहटीला कंटाळुन काजल हिने दि:- 8/12/2023 रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.अशा आशयाची फिर्याद सुरेश मुरलीधर घाडगे यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून आरोपींना अटक झाली होती.
त्यावर आरोपींनी पंढरपूर सत्र न्यायालयात जामीन मिळणेसाठी अर्ज दाखल केला होता, तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता.

त्यावर आरोपींनी ऍड.रितेश थोबडे यांचेमार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामीन मिळणेसाठी अर्ज दाखल केला होता.
अर्जाच्या सुनावणीच्या वेळी ऍड.रितेश थोबडे यांनी आपले युक्तिवादात सदरच्या गुन्ह्याचा तपास हा पूर्णत्वात आलेला असून आरोपींवर केलेल्या आरोपांमध्ये तथ्यता नसल्याचा युक्तिवाद मांडला त्यावरून न्यायमूर्तींनी आरोपींची 25000/- रुपयांच्या जातमूचलक्यावर जामीन मंजूर केला.

यात आरोपीतर्फे ऍड.रितेश थोबडे यांनी तर सरकारतर्फे समीर मानगावकर यांनी काम पाहिले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel