शैक्षणिकसोलापूर बातमी
सोशल उर्दू हायस्कूलच्या मुलींमध्ये शेख सफा आसिफ इक्बाल प्रथम
सोशल उर्दू हायस्कूलची विद्यार्थिनी शेख सफा आसिफ इक्बाल हिने दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ९२.८० टक्के गुण मिळवून शाळेतील चारशेहून अधिक मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. शाळेत असताना तिसरा क्रमांक मिळवला. शेख सफा हिने आपल्या उज्ज्वल यशाचे श्रेय आपल्या कुटुंबांना आणि शिक्षकांना दिले.
अध्यक्ष डॉ. अखलाक अहमद वडवान, मुख्याध्यापक रसूल चौधरी, इम्तियाज शाबादी, पर्यवेक्षक यास्मिन शेख, अल्ताफ कुमठेकर यांनी अभिनंदन केले. रिजवान शेख, जुनेद शेख, शोएब उटकुर व इतर शिक्षकांनी शेख सफाला चांगल्या प्रकारे शिकविल्यामुळेच हे यश संपादन करता आले म्हणून कुटुंबीयांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
गुलबुटेचे संपादक फारुख सय्यद, सी. ए. मौलाना अ. सत्तार शेख व इतर मान्यवरांनी वडील आसिफ इक्बाल यांचे अभिनंदन केले व सफा च्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.