स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमांची रेल्वे विभागाकडून सुरुवात….
आज दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमाची ‘स्वच्छता शपथ’ आपल्या कर्मचाऱ्यांना देऊन सुरुवात सोलापूर विभागाचे अपर विभागीय रेल व्यवस्थापक श्री अंशुमन कुमार माली यांनी केली.
याप्रसंगी सोलापूर विभागातील प्रत्येक रेल्वे स्टेशन, रेल्वे हॉस्पिटल आणि प्रत्येक ऑफिस च्या इन्चार्ज ने मुख्यालयाचे आदेशानुसार आपल्या कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली.
सोलापूर रेल्वे स्टेशन येथे श्री पद्माराव, सहायक कार्मिक अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली आपल्या कल्चरल टीम सोबत स्वच्छते विषयी नुक्कड नाटक सादर केले. या मध्ये प्लॅटफॉर्मवर उपस्थित असणारे प्रवासी यांचे प्रबोधन करण्यात आले.
तसेच जास्तीत जास्त ऑक्सिजन देणारे झाड म्हणजे पिंपळ म्हणून आज ‘एक पेड माँ के नाम’ अंतर्गत श्री अंशुमन कुमार माली यांच्याकडून पिंपळाचे रोपटे लावण्यात आले व उपस्थित कर्मचाऱ्यांना छोटी झाडे भेट देऊन झाडे लावण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. याप्रसंगी श्री अंशुमन माली आपल्या प्रोत्साहन पर भाषणात स्वच्छतेचे महत्त्व समजून सांगितले. ही मोहीम पुढे ही 2 ऑक्टोबर पर्यंत उत्साहाने चालू ठेवण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री रामलाल प्यासे वरिष्ठ विभागीय यांत्रिक इंजिनीयर सोलापूर तसेच श्री सचिन गणेर वरिष्ठ विभागीय अभियंता (समन्वय) यांनी संयुक्तपणे केले. याप्रसंगी रेल्वे विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आपली उपस्थिती दर्शवली.