हिंमत असेल तर निवडणुका घ्या, कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही जिंकू – संजय राऊत
मला शरण यायला भाग पाडणे, शिवसेना सोडायला लावणे अशी दबावनिती आहे. पण मी दबावाला बळी पडणार नाही. हिंमत असेल तर महानगरपालिकांच्या निवडणुका घ्या, कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही आम्ही जिंकू, असे आव्हान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिले आहे.
संजय राऊत म्हणाले, सर्वेच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्यामुळे हे स्पष्ट झाले आहे की या सरकारवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे. या सरकारच्या संदर्भात 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे गेले आहे. त्यामुळे हे बेकायदेशीर सरकार आहे.
कारवाईला सामोरे जायला तयार
संजय राऊत म्हणाले, या सरकारचे बेकायदेशीर आदेश कोणी पाळत असेल तर त्या अधिकाऱ्यांना चौकशीला सामोरे जावे लागू शकते. अशी भूमिका मी मांडली. त्यात तणाव निर्माण होईल असे कोणतेही वक्तव्य नव्हते. देशभरात अशाप्रकारची वक्तव्ये केली जातात. मात्र संजय राऊत बोलल्यामुळे गुन्हा दाखल होणारच. मी कारवाईला सामोरे जायला तयार आहे.
दबावाला बळी पडणार नाही
संजय राऊत पुढे म्हणाले, मला शरण यायला भाग पाडणे, माझ्यावर दबाव आणणे, शिवसेना सोडायला लावणे, नंतर उद्धव ठाकरेंना सोडायला लावणे अशी दबावनिती आहे. पण मी दबावाला बळी पडणार नाही. न्यायलयीन कायदेशीर प्रक्रिया आहे. हे सरकार कसे बेकायदेशीर आहे हे सरकारने पटवून दिले आहे. प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट असते. सरकारला पण आहे.
कर्नाटक निवडणुकीचा हादरा
संजय राऊत यावेळी म्हणाले, देशभरात लोटस ऑपरेशन राबवले. जिथे लोटस होते तिथेच पाकळ्या गळून पडल्या. पंतप्रधानांपासून सर्व यंत्रणा राबवून 70 जागा पण निवडून आणत्या आल्या नाही. सर्व 14 महानगरपालिकेच्या निवडणुका घ्या, आमची तयारी आहे. तुमची हिंमत नाही. कर्नाटक निवडणुकीचा हादरा, त्यांना निवडणुका पुढे ढकलायच्या आहेत. बॅलेट पेपरवर निवडणुका लोकशाहीचा मार्ग आमची मागणी कायम आहे.
पोलिस वाऱ्यावर दंगेखोर मोकाट
संजय राऊत म्हणाले, मी सर्वेसर्वा असल्याचे नार्वेकर म्हणत आहेत, पक्षांतराविषयी त्यांना तिरस्कार नाही. त्यांनी अनेक पक्ष बदलले. या राज्याच्या गृहमंत्र्यांना राजकारणातून फुरसत मिळाली तर ते राज्यातील प्रश्नांकडे लक्ष देतील. पोलिस वाऱ्यावर तर दंगेखोर मोकाट आहेत.