राजकीयदेश - विदेश

हे अपक्ष खासदार सुमालता भाजपच्या वाटेवर

पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार

हुबळी – कर्नाटकातल्या मंड्या लोकसभा मतदारसंघातील अपक्ष खासदार सुमालता या भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे. अर्थात त्या या मतदारसंघातून भाजपच्याच पाठिंब्यावर निवडून आल्या होत्या, पण त्यांनी भाजपमध्ये आतापर्यंत प्रवेश केला नव्हता. त्यांनी भाजप नेत्यांशी चर्चेच्या अनेक फेऱ्या केल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री एस. आर. बोम्मई यांनी दिली.

त्याद्वारे त्यांनीच त्यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत. सुमालता यांनी भाजप अध्यक्ष जे. पी. नढ्ढा यांच्याशी थेट संपर्क साधला आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत त्या आपला अधिकृत निर्णय आज भाजप अध्यक्षांना कळवतील, अशी माहिती बोम्मई यांनी दिली. भाजपचे अनेक नेते कॉंग्रेसमध्ये सध्या प्रवेश करीत आहेत, या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय भाजपला दिलासा देणारा ठरू शकतो.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel