13 वर्षीय पृथ्वी ठरला 6 जणांचा जीवनदाता !
सोलापूर: उमरगा ये येथील १३ वर्षीय पृथ्वी बाळासाहेब वरवटे या चिमुकल्याषा भेटू मृत (ब्रेनडेड) झाल्यानंतर सीएनएस हॉस्पिटतने अवयवदानातून ४ जणांना जीवनदान व दोघांना नेत्रदान मिळाले. त्याद्वारे पुणे व हैदराबाद येथील गरजू रुग्णांना दोन फुप्फुसे, दोन किडनी, यकृत व दोन नेत्रांचे दान करून त्यांच्यावर या अवयवाचे प्रत्यारोपण करण्यात आले.
उमरगा येथील पृथ्वी वरवटे हा तेरा वर्षीय मुलगा काही दिवसांपूर्वी सीएनएसमध्ये मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने दाखल झाला. डॉक्टरांच्या प्रयत्नानंतर देखील त्याचा मेंदू मृत उपचारास प्रतिसाद मिळाला नाही. त्यास डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केले. त्यानंतर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी वरवटे कुटुंबीयास याची कल्पना देऊन आपण पृथ्वीचे अवयवदान करून इतरांचे प्राण वाचवण्यास मदत करावी, असे आवाहन केले. त्यास पृथ्वीच्या कुटुंबीयानी प्रतिसाद देत संमती दिली. त्यानंतर आज तातडीने ग्रीन कॉरीडॉर ऑपरेशन हाती घेण्यात आले. पुणे व हैदराबाद येथील गरजू रुग्णांच्या शरीरात हे अवयव प्रत्यारोपित करण्याचे नियोजन झाले. त्यानंतर विशेष रुग्णवाहिकेद्वारे अवयव दोन्ही शहरात पोचविण्यात आले. तेथे तत्काळ या अवयवांचे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली.
विमानसेवा नसल्याने हृयदान रद्द
या ग्रीन कॉरीडॉरमध्ये हृदयाचे दान देखील केले जाणार होते. त्यासाठी एक गरजू रुग्ण प्रतिक्षेत होता. मात्र, हृदय तत्काळ
कमी कालावधीत पोचवावे लागते. मात्र, सोलापुरात विमानसेवाया ग्रीन कॉरीडॉरमध्ये हृदयाचे दान देखील केले जाणार होते. त्यासाठी एक गरजू रुग्ण प्रतिक्षेत होता. मात्र, हृदय तत्काळ कमी कालावधीत पोचवावे लागते. मात्र, सोलापुरात विमानसेवा नसेल तर हृदयदान स्वीकारून त्याचे प्रत्यारोपण तत्काळ करणे शक्य नाही असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितल्याने हे हृदयदान होऊ शकले नाही.
ठळक बाबी…
सोलापुरातील सर्वात कमी वयाचा अवयवदाता म्हणून पृथ्वी वरवटेची नोंद
सीएनएसकडून पहिल्यांदाच फुप्फुसाचे अवयवदान सीएनएसमधून यावर्षाचे हा ग्रीन कॉरीडॉर किडनी दानातून दोघांचे वाचले प्राण यकृत दानातून एकाच वाचले प्राण फुप्फुस दानातीन एकाला जीवनदान नेत्रदानातून दोघांना दृष्टी एकूण ६ जणांना मिळाले नवे जीवनपृथ्वीवर अंत्यसंस्कार
अवयवदानानंतर पृथ्वी वरवटे यांच्यावर उमरगा येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पृथ्वीच्या पश्चात आई, वडील व एक मोठा भाऊ असा परिवार आहे.
अवयवदानाच्या संदर्भात जनजागृती व्हावी
मागील आठ महिन्यात ग्रीन कॉरीडॉरची तिसरा ड्राईव्ह आहे. त्यात पृथ्वी वरवटे सोलापुरातील सर्वात कमी वयाचा अवयवदाता ठरला आहे. अवयवदानाच्या संदर्भात जनजागृती अधिक झाली तर अनेकांचे प्राण वाचवता येणे शक्य आहे.
– डॉ. प्रसन्न कासेगावकर, चेअरमन, सीएनएस हॉस्पीटल, सोलापूर