2024 ला केंद्रासह राज्यात आमची सत्ता -संजय राऊत
उद्धव ठाकरे हे नरेंद्र मोदींच्या विरोधात टक्कर देणारे नेतृत्व आहे, म्हणून भाजप घाबरले आहे, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. म्हणून इतकं सुडाचे राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे. मुुंबईवर ताबा मिळवून ती आपल्यापासून तोडायची आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवाजी महाराज आणि संभाजीमहाराज यांना माहिती होते की पाठित खंजीर खुपसणार म्हणून ते पाठीवर ढाल लावत होते. आणि महाराष्ट्रासोबत तसेच झाले असे म्हणत केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र डागले आहे. तर आम्ही एकटे लढलो तरी 150 जागांवर विजयी होऊ असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. पुण्यातील निकाल राज्याचे वातावरण दाखवणारा असेल असेही त्यांनी म्हटले आहे.
अमित शहा यांच्यावर जोरदार टीका
शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना संजय राऊत यांनी 40 आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 40 आमदारांच्या राजकीय अंतयात्रा निघणार आहे. 2024 साली दिल्ली आणि महाराष्ट्रात आमची सत्ता असणार आहे. जखमी वाघ आहे, त्यांच्या शेपटीवर पाय देण्याचे काम तुम्ही करताय म्हणत अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
आम्हाला बाजीप्रभुंचा वारसा
मी शंभर दिवसांहून जास्त काळ काराग़हात होतो, मलाही धमक्या आल्या पक्ष सोडण्यासाठी मात्र मी पक्ष सोडला नाही. यांना केवळ अटक वाँरट आले अन् लोक पळून गेले. ‘माझ्यासमोर बसलेत ते खरे वाघ आहेत. खऱ्या वाघांशी लढणे भाजपने गळ्यात पट्टा बांधलेल्या कुत्र्यांना जमणार नाही. वाघाचे कातडे पांघरून वावरणारे निघून गेले. टोळी करुन पळून काय जाताय खातांना खा खा खाल्ले आणि पचवायची वेळ आली तर पक्ष संकटात असताना उद्धव ठाकरेंना एकाकी सोडून सर्व पळून गेले. आपण सर्व बाजीप्रभू देशपांडे यांच्यासासरखे खरे शिवसैनिक आहोत असे म्हणतानाच 2024 मध्ये या सर्वांचा हिशोब आम्ही करणार असे म्हणतानाच गौतम अदानींना चौकशीला बोलवा असेही राऊतांनी म्हटले आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, आम्ही साधे घर घेतले, मुलीचे लग्न केले म्हणून आम्हाला 3 महिने कारागृहात रहावे लागले. मात्र, गौतम अदानी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र असल्याने त्यांना नोटीस पाठविल्या जात नाही, असे म्हणत भाजपवर निशाणा साधला आहे. 1975 मध्ये जनता पक्षाची लाट आली होती. तेव्हाही अनेकांनी शिवसेना जनता पक्षात विलीन करण्याचा मुद्दा घेऊन बाळासाहेब ठाकरेंकडे गेले आहे. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी त्या प्रमुख नेत्यांना सांगितले होते की, तुम्ही सर्व जण जा, मी एकटा 5 ते 10 चाकू सुऱ्यावाल्यासोबत पक्ष वाढवेल असे सांगितले होते. आणि तोच प्रसंग आपल्यावर आला आहे.