सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

29 डिसेंबर रोजी सोलापूरात राज्यस्तरीय पद्मशाली वधू वर मेळाव्याचे आयोजन…

श्री व्यंकटेश्वर पद्मावती मॅरेज ब्युरो सोलापूरच्यावतीने येत्या 29 डिसेंबरला सोलापुरात राज्यस्तरीय पद्मशाली वधू वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनात विवाह सोहळा हा फार मोठा सामाजिक समस्या बनत चाललं आहे.आजच्या धकाधकीच्या धावपळीच्या युगात स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी तरूण तरूणीकडून ऐन तारुण्यात स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष नसते.शिक्षण, नोकरी,घर आदी मुलभूत गरजा पूर्ण झाल्यानंतरच लग्नाचा विषय मुलांच्या मनात येतो तर मुली शिक्षणानंतर स्वतःच्या पायावर उभं राहून आपल्या आईवडिलांना आधार बनण्याचे स्वप्न बाळगल्याने लग्नाचं वय आलेलं असतानाही मुली व त्याचे पालक लग्नाकडे लक्ष देत नाही.त्याचं वय लग्नाचे जात आहे हे त्यांना माहीत असूनही दुर्लक्ष केल्याने आता वधू वरांना योग्य स्थळ मिळणे जिकरीचे बनले आहे.हल्ली वधू वर व पालकांच्या इच्छा पुर्ण होत नसल्याने म्हणावा तसा प्रतिसाद दोघांकडूनही मिळताना दिसत नाही.यावर उपाय म्हणून काळ आणि वेळ वाचावा आणि आपल्या इच्छित आणि योग्य उपवर वधूवरांना सुयोग्य स्थळ भेटावा यासाठी सोलापूर येथे 29 डिसेंबर रोजी राज्यस्तरीय पद्मशाली वधू वर मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती व्यंकटेश दोंता यांनी दिली आहे.
या वधू वर मेळाव्यासाठी राज्यभरातील पद्मशाली समाजातील इच्छुक वधूवरांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.राज्यातून जवळपास 180 वधूवरांनी नाव नोंदणी केली आहे.या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उपवधूसाठी 200 रू.नोंदणी शुल्क तर उपवरांसाठी 300रू नोंदणी शुल्क आकारले आहे.या नोंदणी केलेल्या उपवधू व वर आणि त्यांच्या आईवडीलांना मोफत एन्ट्री व भोजनाची सोय करण्यात आल्याची माहिती संयोजन समितीच्यावतीने देण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी व्यंकटेश दोंता , दिगंबर इप्पलपल्ली यांच्यासह मॅरेज ब्युरोचे रमेश अन्नलदास, मुरली धारा ,सौ.जयश्री श्रीनिवास सामल , श्रीनिवास सामल,भास्कर अल्ली,सागर इप्पलपल्ली,योगीनाथ स्वामी,डॉ विश्वनाथ आडम , दयानंद अल्लोळी,रक्षंदा स्वामी, श्रृती बोगा, आशिष भूदत आदी परिश्रम घेत आहेत

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel