महाराष्ट्र

’41 वर्षांचा झालोय, आता कंबर दुखते…’; वाढत्या वयामुळे रणबीर कपूरकडून होत नाही ‘हे’ काम

Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा सध्या बॉबी देओलसोबत त्याच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. रणबीर आणि बॉबी देओल हे नुकतेच मुंबईत त्यांच्या चित्रपटाच्या म्यूजिक लॉन्चला पोहोचले होते.

त्यावेळी त्या दोघांनी मिळून रणबीरचा 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ये जवानी है दीवानी’ या चित्रपटातील ‘बदतमीज दिल’ या गाण्याची हूक स्टेप केली. त्यांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्याचा डान्स झाल्यानंतर रणबीरनं त्याच्या चाहत्यांकडे एक विनंती केली आहे.

रणबीर कपूरनं ‘बदतमीज दिल’ या गाण्यावर डान्स केल्यानंतर चाहत्यांकडे विनोद करत एक विनंती केली आहे. जसं गाणं थांबलं, रणबीर म्हणाला, ‘मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, हे गाणं 2013 मध्ये प्रदर्शित झालं होतं. पण मी कुठेही गेलो की तिथे हे गाणं माझ्या मागे येतं. आता मी 41 वर्षांचा झाला आहे, आता माझ्याकडून हे नाही होतं. माझी कंबर दुखते.’ इतकंच नाही तर पुढे रणबीर हे देखील म्हणाला की तो इव्हेंट मॅनेजरला देखील हे सांगणार आहे की यापुढे हे गाणं लावू नका. माझं वय होतंय आणि त्यामुळे स्लो गाणं लावा. रणबीरनं केलेलं हे वक्तव्य ऐकल्यानंतर तिथे उपस्थित असलेले सगळे चाहते हसू लागतात.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel