“कट रचून ,खून करून ,पुरावे नष्ट केल्याप्रकरणी आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर…
यात थोडक्यात हकीकत अशी कीः तारीख ०४ -०७ -२०२४ रोजी तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 328/ 2024 अन्वये सहा लोकांविरुद्ध इंडियन पिनल कोड कलम 302, 120 -बी , 201 सह -34 प्रमाणे फिर्यादीने दिलेल्या फिर्यादी जबाब वरून सहा लोकांविरुद्ध कट रचून खून करून पुरावे नष्ट करणे अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये फिर्यादीने त्याचा मुलगा मयत हा दिनांक 30-6-2021 रोजी त्यांचे शेतातील शेतमजूर आरोपी प्रकाश विश्वनाथ फुलमाळी याने शेताकडे फोन करून बोलवल्या वरून तो त्यांचे शेतात गेला होता त्यानंतर तो घरी परत आला नाही म्हणून यातील फिर्यादीने ,आरोपी प्रकाश विश्वनाथ फुलमाळी यास फोन करून त्यांचा मुलगा अद्याप घरी परत आला नाही आपण त्याचा शोध घेऊ व त्याला शेतात शोधण्यास जाऊ असे सांगितले असता आरोपी प्रकाश फुलमाळी हा शोधण्यात आला नव्हता त्यानंतर दिनांक 2 – 7 – 2021 रोजी फिर्यादीच्या मुलगा हा बाजूस असलेल्या शेतामध्येच विहिरीत त्याचे प्रेत आढळून आले त्याबाबत पोलिसात एक्सीडेंटल डेथ अशी नोंद करण्यात आली होती परंतु फिर्यादी यांनी सोलापूर येथील मेहरबान न्यायदंडाधिकारी वर्ग एक यांचे कोर्टात सहा लोकांविरुद्ध खाजगी फिर्याद दाखल केली होती त्यामध्ये फिर्यादीच्या मुलास कट रचून सहा लोकांनी मिळून प्रेम प्रकरणातून जीवे मारले असल्याबाबत चे नमूद करून पोलिसांनी घाई गडबडीने एक्सीडेंटल डेथ असे नमुद करून तपास केला नाही म्हणून आरोपींविरुद्ध खाजगी फिर्याद दाखल केली होती त्यामध्ये मेहरबान न्याय दंडाधिकारी वर्ग एक यांनी सीआरपीसी चे कलम 156 (3) प्रमाणे हुकूम केला होता त्यावरून तालुका पोलीस स्टेशन येथे तारीख 4–7-2024 रोजी इंडियन पिनल कोड कलम 120 बी ,201, 302 सह- 34 प्रमाणे फिर्याद दाखल झाली होती. सदर गुन्ह्यात अटक होईल या भीतीने आरोपी प्रकाश विश्वनाथ फुलमाळी राहणार नंदुर तालुका दक्षिण सोलापूर यांनी ॲडव्होकेट डी.एन.भडंगे व ॲडव्होकेट एन.एन.भडंगे यांच्यामार्फत नवीन कायदा प्रमाणे भारतीय न्याय संहिता चे कलम 482 प्रमाणे अटकपूर्व जामीन करता अर्ज दाखल केला होता सदर अर्जास सरकारी वकिलांकडून तीव्र विरोध दर्शविण्यात आला होता सदर गुन्ह्यांमध्ये फाशीची शिक्षा असल्याने तसेच आरोपींनी केलेला गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असून तपास अद्याप चालू आहे असा युक्तिवाद करून आरोपीस जामीन देण्यात येऊ नये म्हणून तीव्र विरोध दर्शविला होता परंतु आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट.डी. एन.भडंगे व ॲडव्होकेट एन.एन. भडंगे यांनी फिर्याद मध्ये झालेला गुन्हा व मेहरबान कोर्टात दाखल झालेली खाजगी फिर्याद यामध्ये तीन वर्षाचा कालावधी असून,त्यामध्ये संशय होता तर पोलीसांना आरोपी का केले नाही,तसेच मयताची एक्सीडेंटल डेथ म्हणून नोंद झाली असल्याने तपास पूर्ण झालेला आहे तसेच आरोपीकडून कोणताही मुद्देमाल हस्तगत करण्याचा नसल्याने तसेच आरोपी मेहरबान कोर्टाच्या प्रत्येक हुकूमाचे पालन करण्यास तयार असल्याबाबत चे नमूद करून आरोपी हा शेतमजूर व गरीब कुटुंबातील आहे व त्याला अटकपुर्व जामीन मंजुर करावा असा युक्तिवाद आरोपीच्या वतीने करण्यात आला होता सदरचा युक्तिवाद मेहरबान सेशन जज्ज श्रीयुत राणे साहेब यांनी ग्राह्यमाणून आरोपी प्रकाश विश्वनाथ फुलमाळी याचा अटकपूर्व जामीन आज दि.०३-०९-२०२४ रोजी रक्कम रु ५०,०००/- इतक्या रक्कमेच्या जामीनावर व आय ओ सांगतील तेंव्हा हजर राहण्याच्या आटीवर आटकपुर्व जामीन मंजुर केला यात आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट.डी.एन.भडंगे व ॲडव्होकेट एन.एन. भडंगे यांनी काम पाहिले