90 किलो गांजाची लागवड केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर…
बाजीराव लोभा राठोड वय 56 रा कामती खुर्द ता मोहोळ, जि:- सोलापूर यास गांजाची शेती केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी जामीन मंजूर केला.
यात हकीकत अशी की, दि 31/10/2022 रोजी गोपनीय बातमीदारांमार्फत पोलिसांना बातमी मिळाली की, बाजीराव लोभा राठोड याने त्याच्या शेतामध्ये उसाच्या पिकात गांजाची झाडे लावलेली आहेत, त्यावरून पोलिसांनी सदरचे ठिकाणी छापा टाकून उसाच्या पिकातून ९०.७९ किलो गांजाची लहान-मोठे असे एकूण 75 झाडे जप्त केली, अशा आशयाची फिर्याद शिवराज जनार्दन कासवीद यांनी कामती पोलीस ठाण्यात दिले होती. त्यावरून बाजीराव यास अटक झाली होती.
त्यावर बाजीराव याने जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता, तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता.
त्यावर बाजीराव याने ऍड.रितेश थोबडे यांचेमार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता.
अर्जाच्या सुनावणीच्या वेळी ऍड. रितेश थोबडे यांनी आपले युक्तिवादात वास्तविक पाहता गांजाचे वजन हे व्यावसायिक प्रमाण आहे की कसे हे दाखवणारा कोणताही पुरावा नाही, त्यामुळे आरोपीस जामीन देण्यात यावा असा युक्तिवाद मांडला, त्यावरून न्यायमूर्तींनी आरोपीस 25,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
यात आरोपीतर्फे ऍड रितेश थोबडे, ऍड.किरण सराटे यांनी तर सरकारतर्फे ऍड.पंकज देवकर यांनी काम पाहिले.