महाराष्ट्र

फडणवीस यांच्यामुळेच मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या -रमेश गायकवाड

देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा मंत्री झाल्यापासून गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळात एकही बैठक घेतली नाही. त्यामुळे अधिकारी कोट्यावधीचे टेंडर घोटाळे करत आहेत. शेतकऱ्यांना पाणी न मिळाल्यामुळे त्यांच्या कार्यकाळात 500 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहे. याची नैतिक जवाबदारी घेत देवेंद्र फडणवीसांनी मंत्री पदाचा राजीनामा दयावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांनी केली आहे.

यासाठी 20 मार्चला विभागीय आयुक्त कार्यालयावर त्यांच्या राजीनामासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे

याबाबत फडणवीसांच्या मागणीसाठी 20 मार्च 2023 रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर प्रचंड निदर्शने करण्यात येईल. फडणवीस यांनी मराठवाड्याकडे दुर्लक्ष केले असून त्यामुळे मराठवाडामध्ये शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचा दावा गायकवाड यांनी केला आहे.

वॉटर ग्रिड योजना जीवाशी खेळ

गायकवाड म्हणाले की, ही योजना म्हणजे शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त करणारा कट आहे. सन 2023 राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा वॉटर ग्रिडसाठी 10,500 कोटीची खोटी मराठवाड्याच्या भावनेशी खेळणारी घोषणा केली आहे. जायकवाडी धरणातून वॉटर ग्रिड योजनेसाठी 11 मोठी धरणे जोडली जाणार आहे. ह्या योजनेसाठी पर्यावरण परवानगी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र परवानग्या नसल्यामुळे ही योजना त्यांनी केंद्र शासनाच्या कोर्टात चेंडू म्हणून पाठविली.11 मोठी धरणे जोडण्याचा जो प्रस्ताव आहे तो इंजिनिअर्सच्या मते पाईपलाईनने जोडणे शक्य होणार नाही. पाणीच नसल्यामुळे शेतीला 75 टक्के पिण्याला 15 टक्के उद्योगधंदा 10 टक्के असा नियम आहे.धरणात पाणी नसेल तर योजनेसाठी पाणी कुठून येणार असा सवाल त्यांनी केला आहे.

1000 शेतकऱ्यांची आत्महत्या

गेल्या तीन वर्षापासून मराठवाडा विभागात मुसळधार पाऊस पडला सर्व छोटी-मोठी धरणे क्षमतेपेक्षा जास्त भरली असतांना, जायकवाडी धरणाच्या क्षमतेच्या 10 धरणाचे पाणीखाली आंध्र प्रदेशाला सोडले गेले. तरीही मराठवाड्यात सिंचनाचा टक्का वाढला नाही.

शेतीला पाणी न मिळाल्यामुळे दरवर्षी हजारो शेतकरी व शेतमजुर कर्जबाजारी व नापिकी झाल्यामुळे आत्महत्या करीत आहेत. याला जवाबदार असलेल्या सिंचन विभागातील अधिकाऱ्यांवर शेतकरी आत्महत्येची जवाबदारी निश्चित करावी, अशी आमची मागणी आहे. अधिकाऱ्याच्या विरोधात मराठवाडा बहुजन विकास आघाडीतर्फे प्रचंड जनआंदोलन उभारण्यात येईल. जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दयावा या मागणीसाठी 20 मार्च 2023 रोजी निदर्शने करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel