क्राईममहाराष्ट्र

गोबरगॅसच्या टाकीत पडून 4 जणांचा मृत्यू : एका जणांवर खासगी रूग्णालयात उपचार

पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील खांडज गावा मध्ये एका गोबरगॅसच्या टाकीत पडून चौघांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, या घटनेत आणखी एक इसम अत्यवस्थ असून त्यास औषध उपचारासाठी बारामतीमधील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृत व्यक्तीमध्ये पिता-पुत्राचा आणि चुलत्याचासह एका व्यक्तीचा समावेश आहे.

प्रकाश सोपान आटोळे, प्रविण भानुदास आटोळे, भानुदास आनंदराव आटोळे व बापुराव लहुजी गव्हाणे (सर्व रा. बारामती ,पुणे) असे मृत्यमुखी पडलेल्या इसमाची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खांडज गावच्या हद्दीतील 22 फाटयाजवळील आटोळेवस्ती येथे ही घटना घडली आहे. बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. गोबरगॅसच्या टाकीमध्ये पडल्याने चौघांचा मृत्यू झाला आहे तर एक जण अत्यवस्थ आहे.चौघांना तात्काळ बारामतीमधील सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. अत्यवस्थ असणार्‍या एका इसमाला पुढील उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या घटनेची माहिती मिळताच, रूग्णालयाच्या परिसरात नागरिकांनी आणि मृतांच्या नातेवाईकांची गर्दी झाली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मयत चार व्यक्तींचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविचछेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. याबाबत पुढील तपास बारामती पोलिस करत आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel