महाराष्ट्रक्राईम

सोलापुरात तब्बल 8 तोळ्यांसह रकमेची चोरी !!!

मुलगा बारावीच्या परीक्षेला गेला.‎ नातेवाईक आजारी असल्यामुळे आई‎ त्यांना भेटण्यासाठी गेली. घर बंद‎ असल्याची संधी साधून विजापूर रोड,‎ राजस्व नगरातील एका घरात चोरी झाली‎ आहे. तब्बल आठ तोळे दागिने आणि ३५‎ हजार रुपये रोख असा एकूण ३ लाखांचा‎ ऐवज चोरीला गेला आहे. श्रीमती अर्चना‎ संजय पवार (रा. राजस्व नगर, विजापूर‎ रोड) यांनी विजापूर नाका पोलिसांत १८‎ मार्च रोजी फिर्याद दिली आहे. हा प्रकार‎ शुक्रवारी सकाळी दहा ते दुपारी तीन या‎ वेळेत घडला.‎ घराचा कडी कोयंडा उचकटून‎ कपाटातील दागिने नेले आहेत. दुपारी तीन‎ वाजता परीक्षा देऊन घरी आल्यानंतर कडी‎ कोयंडा उचकटल्याचे मुलाला दिसले.‎ त्याने आईला घटनेची माहिती दिली.‎ घरफोडी झाल्याचे लक्षात येताच‎ पोलिसांना माहिती दिली. पोलिस आले.‎

सीसीटीव्ही फुटेजच्या‎ आधारे चौकशी सुरू
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणि‎ रेकॉर्डवरील कोण आहेत का याबाबत‎ चौकशी सुरू असल्याचे फौजदार मुरकुटे‎ यांनी सांगितले. तीन अंगठ्या, छोटी‎ अंगठी, मणिमंगळसूत्र, फॅन्सी मंगळसूत्र,‎ लॉकेट, सोन्याचे पेंडल मणी आणि ३५‎ हजार रुपये असा ३ लाखाचा ऐवज गेला.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel