संजय राऊत मूर्ख आहेत, -संजय शिरसाट
मूर्ख आहेत संजय राऊत, महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगरमध्ये होणारी सभा म्हणजे डायलॉगबाजी करण्यासाठी घेतलेला कॉमेडी शो आहे, अशाप्रकारची टीका शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे. सगळ्या दंगली ठरवून घडवल्या जात आहेत, संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर राऊतांनी टोला लगावला आहे.
संजय शिरसाट म्हणाले, दंगल पूर्वनियोजित होती. अर्ध्या तासात बॉम्ब कुठून आले, शहरात कोणता तरी अंतर्गत असंतोष आहे किंवा अतिरेकी कारवाया ज्या आहेत त्या वाढत चाललेल्या आहेत. यांचा कुठेतरी बंदोबस्त व्हायला हवा. जो कोणी यात दोषी असेल त्याच्यावर कारवाईची मागणी करणार असल्याचे शिरसाट म्हणले.
शांततेत कारवाई केली
इम्तियाज जलील यांनी पोलिसांना यायला उशीर झाल्याचा आरोप केला होता.याला उत्तर देताना संजय शिरसाट म्हणाले, पोलिसांना उशीर झाला तर त्यांच्या गाड्या कसा जाळल्या, पोलिस त्याठिकाणी हजर होते. रमजान, रामनवमीमुळे पोलिसांनी शांततेत कारवाई पार पाडली. कुठेही अनुचित प्रकार घडू नये, वातावरण चिघळू नये यासाठी त्यांनी शांततेत कारवाई केली.
टोमणे आणि डायलॉग सभा
संजय शिरसाट म्हणाले, महाविकास आघाडीने सभा घ्यावी. पोलिस त्यांची जबाबदारी पार पाडतील. ती पोलिसांची जबाबदारी आहे. यांना फक्त राजकारण करायचे आहे. त्यांना जर सभा घेण्यासाठी बंदी घातली, लोकशाहीचा गळा घोटला जात आहे, असा आरोप ते करतील. मुळात त्यांना केवळ राजकारण करायचे आहे. त्यांच्या सभेत दोन-चार टोमणे आणि डायलॉग असतील.
एकमेकांना डोळे मारतील
संजय शिरसाट म्हणाले, ते महाविकास आघाडीच्या कॉमेडी सभेत ते एकमेकांना डोळे मारतील. या सभेत शेतकऱ्यांच्या किंवा कष्टकऱ्यांच्या हिताचे काहीही बोलणार नाहीत. महाविकास आघाडीची सभा म्हणजे केवळ कॉमेडी शो आहे. परवानगी दिली तर का दिली आणि नाही दिली तर का नाही दिली असे यांचे म्हणणे असते.