क्राईममहाराष्ट्र

४ वर्षांच्या चिमुरड्याची जमिनीवर आपटून हत्या!

अंगात कपडे न घालण्याच्या कारणावरून रागावलेल्या प्रियकराने आपल्या प्रेयसीच्या ४ वर्षांच्या चिमुरड्याला काठीने बेदम मारहाण करत त्याला जमिनीवर आपटून ठार केल्याची घटना तालुक्यातील गुळवंच येथे गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. या घटनेत कृष्णा अरुण माळी (४) याचा मृत्यू झाला.

त्याची आई काजल अरुण माळी (१९) हिने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित अमोल नाना माळी (२०, रा. बोकडदरा, ता. निफाड) यास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. जखमी बालकाला सिन्नर ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे समजताच युवकाने विवाहिता व मृत बालकाला रुग्णालयात सोडून धूम ठोकली. मात्र, एमआयडीसी पोलिसांनी संशयित आरोपीला २४ तासाच्या आत बेड्या ठोकल्या.

निफाड तालुक्यातील बोकडदरा येथील संशयित गणेश उर्फ अमोल नाना माळी (२०) व त्याची दोन मुलांची आई असलेली प्रेयसी बोकडदरा येथून फरार झाले होते. हे दोघे गेल्या १५ दिवसापासून गुळवंच शिवारात संपत कांगणे या शेतकऱ्याकडे कामास होते. गुरुवारी या दोघांत वाद झाले. कृष्णा याने उलटा शर्ट घातल्याची कुरापत काढून संशयित गणेश याने आधी काठीने मारून नंतर कृष्णाचे डोके जमिनीवर आपटून त्याचा खून केला.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel