महाराष्ट्रराजकीयशैक्षणिक

बालभारती विद्यालय मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरा

सोलापूर – सुप्रभात शिक्षण मंडळ संचलित सुरभी बालक मंदिर, बालभारती प्राथमिक विद्यालय बालभारती माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय मध्ये महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव माननीय हाजी शबबीर भाई शेख सर उपस्थित होते .त्याचबरोबर बालभारती प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय रिजवान सर शेख सर बालभारती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मुला सर व तसेच सर्पमित्र माननीय अभिलाष गिरबोणे, तुकाराम एकबोटे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. त्यानंतर महाराष्ट्राच्या राज्यगीताचे गायन झाले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे सत्कार करण्यात आले विद्यालयातील सहशिक्षका सौ तरन्नुम शेख मॅडम यांनी किल्ल्यांचे भव्य प्रदर्शन सादरीकरण केले त्यानंतर विद्यार्थी मनोगत, पोवाडा, नाट्यछटा आदींचे सादरीकरण झाले शिक्षक मनोगत श्री नदाफ सर यांनी केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. रिजवान शेख सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात माननीय शब्बीर शेख सर यांनी शिवाजी महाराजांबद्दल सखोल माहिती सांगितली व विद्यार्थ्यांचे भाषण ऐकून त्यांनी विद्यार्थ्यांना बक्षीसही दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मेळकुदे मॅडम तर आभार श्री अनिस शेख सर यांनी मानले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel