क्राईम

पोलिसांसमोर अतिकची भावासह हत्या…

तीन दशकांपासून दहशत असलेल्या प्रयागराज पश्चिम भागातच अतीक अहमदची भावासह निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांच्या ताब्यात असताना प्रसारमाध्यमांशी बोलतानाच दोघा भावांच्या कानशिलावर पिस्तूल ठेवून गोळ्या घालण्यात आल्या.

पोलिसांच्या एका तुकडीने दोघांना वैद्यकीय चाचणीसाठी कॉल्विन रुग्णालयात आणले होते. गोळ्या झाडताच कडे केलेले पोलिस बाजूला झाले. अतीक आणि अश्रफ दोघेही एका बेडीने बांधलेले होते. दोघेही जागीच ठार झाले. हल्लेखोर २२-२३ वर्षांचे तीन तरुण होते. हत्या केल्यानंतर ते शरण आले. पोलिसांनी तीन हल्लेखोर लवलेश तिवारी, सनी आणि अरुण मोर्य यांना ताब्यात घेतले आहे. पत्रकार बनून ते पोलिसांच्या तुकडीसोबत अतीक-अश्रफसोबत निघाले होते. रात्री उशिरा प्रयागराजच्या १७ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

अतीकचा भूतकाळ..हिस्ट्रीशीटर ते खासदार अन् अब्जावधींचे साम्राज्य..

अतीक..संपूर्ण जीवन गुन्हे, गुन्हेगार आणि राजकारणाच्या इशाऱ्यावर नाचला. त्याने अब्जावधींचे साम्राज्य उभे केले. गुंडगिरीतून कायदा खिशात घालून तो वावरला. १९६२ मध्ये अलाहाबादच्या धूमनगंजमध्ये जन्मलेल्या अतीकचे वडील गुन्हेगारी प्रवृत्तीचे होते. त्यामुळे गुन्ह्याचा त्याला वारसा मिळाला होता. त्यातच तो लहानाचा मोठा झाला. त्याच्यावर १९७९ मध्ये पहिला खटला चालवला गेला. पुढे राजकारणात उतरला.

२७ व्या वर्षी आमदार झाला. त्याच्यावर १०० हून जास्त गुन्हे दाखल आहेत. ४४ वर्षांत पहिल्यांदा त्याला उमेश पाल अपहरण प्रकरणात जन्मठेप झाली. त्याच्या गँगचा क्रमांक २२७ होता. राजकारण-गुन्हेगारी जीवन जगणाऱ्या अतीकने कोट्यवधींची माया जमवली होते. डझनभर राज्यांत त्याने पाय पसरलेले होते. खंडणी, अनेक प्रकारची कंत्राटे यातून त्याने अब्जावधी रुपये कमावले. उमेशपाल हत्याकांडनंतर त्याची ४१५ कोटींची संपत्ती जप्त झाली. एकूण २३६८ कोटी रुपयांचा आर्थिक तडाखा देण्यात आला.

योगींनी बैठक घेतली.. न्यायिक आयोगाची स्थापना

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रात्री उशिरा उच्चस्तरीय बैठक घेऊन ३ सदस्यीय न्यायिक आयोगाच्या तपासाचे आदेश दिले आहेत. प्रयागराजमध्ये हायअलर्ट आहेत. यूपीत कलम १४४ लागू झाले.

यूपीचे मंत्री म्हणाले..पाप-पुण्याचा हिशेब याच जन्मी होतो

यूपीचे मंत्री स्वतंत्र देव सिंह म्हणाले, पाप-पुण्याचा हिशेब याच जन्मात होतो. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव म्हणाले, यूपीमध्ये गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. पोलिस सुरक्षेत हत्या होत आहे.

तणावाची शक्यता..डीजीपी व गृहसचिव घटनास्थळी रवाना

मुख्यमंत्री योगींच्या आदेशानुसार डीजीपी व गृहसचिव उशिरा रात्री विशेष विमानाने प्रयागराजकडे रवाना झाले. राज्यातील काही संवेदनशील भागात तणावाची शक्यता आहे. त्यामुळे दक्षता घेतली गेली आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel