देश - विदेशराजकीय

BRS महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा लढवणार…

भारत राष्ट्र समिती महाराष्ट्रात मुसंडी मारण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी के. चंद्रशेखर राव यांनी कंबर कसली असून, 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 288 जागा लढण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. त्यासाठी उद्या नांदेडमध्ये राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

नांदेडमध्ये 19 ते 20 मे रोजी होणाऱ्या या शिबिराला राज्यातल्या सर्व विधानसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकारी येणार असल्याचे समजते. या बैठकीला तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि ‘बीआरएस’चे प्रमुख के. चंद्रशेखर राव उपस्थित राहतील.

कसा आहे कार्यक्रम?

नांदेडमधील अनंता लॉन्स येथे भारत राष्ट्र समितीचे शिबिर होणार आहे. राज्यभरातील प्रमुख निमंत्रित पदाधिकाऱ्यांनाच या शिबिरात प्रवेश असेल. या पदाधिकाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था गुरुद्वारामधील पंजाब भवनात केल्याची माहिती भारत राष्ट्र समितीच्या किसान सेलचे महाराष्ट्र अध्यक्ष माणिकराव कदम यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

जोरदार पूर्वतयारी

के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात उतरण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. यापूर्वी त्यांच्या छत्रपती संभाजीनगरसह तीन ठिकाणी जोरदार सभा झाल्या. या सभेला मोठी गर्दी होती. अनेक पक्षातील असंतुष्ट आणि प्रस्थापित नेत्यांचा ‘बीआरएस’कडे ओढा आहे. शिवाय के. चंद्रशेखर राव यांच्या वाढलेल्या राजकीय महत्त्वकांक्षेमुळे त्यांना विधानसभा निवडणूक खुणावते आहे.

महानोंदणी अभियान

महाराष्ट्रातली पाळेमुळे घट्ट करण्मयासाठी भारत राष्ट्र समिती पक्ष सदस्य महानोंदणी अभियान सुरू करणार आहे. यावरही बैठकीत चर्चा होईल. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत कसे उतरायचे, त्याची तयारी कशी करायची, पक्षाची प्रत्येक गावात, शहरात शाखा स्थापन करणे, तळागाळात ध्येय धोरणे नेणे, तेलंगणात राबविलेल्या योजनांचा महाराष्ट्राच प्रचार आणि प्रसार करणे यावरही या शिबिरात चर्चा होणार असल्याचे समजते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel