महाराष्ट्र

चोर समजून तीन जणांना बेदम मारहाण, एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू

परभणी तालुक्यात मॉब लिंचिंगची घटना समोर आली आहे. परभणीतील उखळद गावात ग्रामस्थांनी चोर समजून तीन जणांना बेदम मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली.

तरुण रात्री उशिरा गावातून जात होते

घटनेबाबत परभणी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक रागसुधा आर यांनी सांगितले की, कृपणसिंग, गोरासिंग टाक आणि अरुणसिंग टाक हे तीन तरुण रात्री उशिरा दुचाकीवरून उखळद गावातून जात होते. तिघेही चोर असल्याचा संशय ग्रामस्थांना आला. त्यामुळे ग्रामस्थांनी तिघांनाही पकडून बेदम मारहाण केली. यापैकी कृपानसिंगचा नंतर मृत्यू झाला. तो अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे.

मारहाण करून ग्रामस्थांनी पोलिसांना केला फोन

पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, ग्रामस्थांनी तरुणांना बेदम मारहाण केली. मारहाणीत तिघेही गंभीर जखमी झाले. त्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना फोन करून तीन शेळ्या चोरांना पकडल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिस तेथे पोहोचले. पोलिसांनी तिघांचीही जमावापासून सुटका करून त्यांना रुग्णालयात दाखल केले असता एकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली.

चौघांना अटक
दरम्यान, या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकूण 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापैकी 4 जणांना सोमवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. यामध्ये मुख्य आरोपी म्हणून माजी सरपंच अक्रम पटेल यांनाही अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel