करमाळा, सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघांसह, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका लढवणार
जिल्ह्यातील करमाळा आणि सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघांसह, महापालिका आणि जि.प. परिषद निवडणुका लढवण्याचा निर्धार प्रहार जनशक्ती पक्षाने केल्याची माहिती, पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी रविवारी (दि. ४) पत्रकार परिषदेत दिली.
चौधरी सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. दोन दिवसांत त्यांनी सोलापुरातील मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सद्यस्थितीचा निवडणुकीच्या अंगाने आढावा घेतला. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील १५ विधासनभा, दोन लोकसभा निवडणुका लढवण्याची घोषणा केली.
खडसेंकडे अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र
चौधरी म्हणाले, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे दिव्यांगत्वाचे बनावट प्रमाणपत्र आहे. आमदार बच्चू कडू यांच्याकडे दिव्यांग महामंडळाची जबाबदारी येत आहे. पहिली चौकशी खडसेंची होईल.
मंत्र्यांची विमाने येतात, प्रवासी सेवाच का नाही
शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी शेतकऱ्यांसाठी चिमणी बचाव आंदोलनात सहभागी होऊ, असे सांगितले. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्याची विमाने येतात, मग छोट्या प्रवासी विमानसेवेला कसली अडचण, असा सवाल केला. जल जीवन मिशनच्या कामांमध्ये अनियमितता झाल्याबाबत आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले.