महाराष्ट्र

खासगी बसची कंटनेरला धडक, 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू

पुणे – सातारा महामार्गावर कापूरहोळजवळ वरवे गावाच्या हद्दीत तीन वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. एक खासगी बस, एक शिवशाही व एका कंटेनरची एकमेकांना जोरदार धडक बसली. यात खासगी चार बसमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, 23 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहितीही समोर आली आहे.

एसटीचेही मोठे नुकसान

आज सकाळी साधारण 10 वाजेच्या आसपास हा अपघात झाला. वाहनांची धडक एवढी भीषण होती की, यामध्ये खासगी बस पूर्ण उलटली आहे. याच बसमधील चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर, 23 जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघातात एसटीच्या शिवशाही बसचेही मोठे नुकसान झाले आहे.

पुण्याहून साताऱ्याला जात होती वाहने

महामार्ग पोलिसांनी या अपघाताबाबत माहिती दिली आहे की, ही वाहने पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जात असताना हा भीषण अपघात झाला आहे. पुण्याच्या दिशेने येत असलेल्या कंटेनरला खासगी बसने मागून जोराची धडक दिली. या धडकेत बस उलटली. बस उलटल्यामुळे बसमधील प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर काही जण गंभीर जखमी आहेत. याचवेळी मागे असलेल्या शिवशाही बसचीही कंटेनरला धडक बसली. एक कार देखील कंटेनरला मागून धडकली. मात्र, कारमधील प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर पोलीस आणि स्थानिक नागरिकांकडून मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.

पुणे-सातारा महामार्गावर वाहतूक कोंडी

दरम्यान, सातारा रस्त्यावर या अपघातामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तासाभराच्या प्रयत्नानंतर वाहतूक कोंडी सोडवण्यात पोलिसांना यश आले. हा अपघात एसटीच्या भोर आगाराच्या हद्दीमध्ये घडला असून आगारातील एसटीचे पथक घटनास्थळाकडे रवाना झाले आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel