महाराष्ट्र

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी किर्तनात तल्लीन; टाळ वाजत केले भजन

PMModi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्या हस्ते आज 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास मोदी नाशिकमधील ओझर विमानतळावर दाखल झाले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं. त्यानंतर त्यांच्या भव्य रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी नाशिककरांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याचे पाहायला मिळाली.

रोडशोनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामकुंड परिसराला भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काळाराम मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले. येथे विशेष किर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या किर्तनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी झाले होते. काळाराम मंदिरात मोदींच्या हस्ते प्रभू श्रीरामाची विधिवत पूजा आणि महाआरती करण्यात आली. विशेष म्हणजे वारकऱ्यांसोबत पंतप्रधान मोदी टाळ वाजवण्यात दंग झाले होते. काळाराम मंदिरामध्ये टाळ वाजवून राम भक्तीत पंतप्रधान मोदी तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले.

काय म्हणाले नरेंद्र मोदी?

सध्या मोदींचे राम मंदिरातील भजनात तल्लीन झाल्याचे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यानंतर भाषणातून तरुणांना संबोधित करताना ते म्हणाले की, “माझं भाग्य आहे की स्वामी विवेकानंदांच्या जयंतीला मी आज नाशिकमध्ये आहे. मी सर्वांना युवा दिनाच्या शुभेच्छा देतो. आज राजमाता जिजाऊ माँ साहेबांचीही जयंती आहे. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन करण्यासाठी मला महाराष्ट्राच्या वीरभूमीत येण्याची संधी मिळाली.”

यावेळी नरेंद्र मोदींनी युवकांना चार मंत्र सांगितले. मेड इन इंडिया उत्पादनाचा उपयोग करा, मद्यपानापासून दूर राहा, ड्रग्जच्या आहारी जाऊ नका, आई बहिणींवरून अपशब्द वापरणे बंद करा आणि नवीन मतदारांनी मतदानासाठी नोंद करा, असा सल्ला त्यांनी दिला.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel