महाराष्ट्र

प्रणिती शिंदेंच्या वाहनावर हल्ला;प्रणिती शिंदें प्रचंड संतापल्या आणि म्हणाल्या हे तर भाजपचे लोक

सोलापूर……..ब्रेकिंग

प्रणिती शिंदेंच्या वाहनावर हल्ला;प्रणिती शिंदें प्रचंड संतापल्या आणि म्हणाल्या हे तर भाजपचे लोक

गाडीला हात लावाल तर याद राखा;प्रणितीचा संताप

सोलापूर:काँग्रेसच्या सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे गावभेट दौरे करत सोलापूर जिल्हाभर विविध ठिकाणी भेटी देत मतदारांशी संवाद साधत आहे.प्रणिती शिंदे या गुरुवारी दिवसभर पंढरपूर तालुक्यातील विविध गावांना भेटी देत सरकोली गावात गेले असता,प्रणिती शिंदेच्या वाहनाला अडवून जबरदस्त घोषणाबाजी करण्यात आली.वाहनाची तोडफोड करण्याचा प्रयत्न काही जणांनी केला.वाहनात बसलेल्या प्रणिती शिंदे देखील प्रचंड संतापलेल्या अवस्थेत होत्या.वाहनाबाहेर येऊन प्रणितीनी गाडीला हात लावायचा नाही अशा भाषेत उत्तरे दिली.सरकोली गावात प्रणिती शिंदेची शाब्दिक चकमक देखील झाली.सोलापुरात आल्यानंतर प्रणिती शिंदेनी माध्यमांना माहिती देताना सांगितले हे लोक भाजपची होती.कुणी आंदोलक नव्हती असा आरोप भाजपवर केला आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel