सहाय्यक पोलिस निरिक्षक देवकर 1 लाख 25 हजार लाच घेऊन पळाला
पगार 90 हजार आणि लाच स्वीकारली 1 लाख 25 हजारांची
अकोला ( प्रतिनिधि) :- घडलेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मंजूर होईपर्यंत आरोपीला अटक न करण्याच्या बदल्यात सहायक पोलिस निरीक्षक राहुल सुरेशराव देवकर (३९) याने 1 लाख 50 हजारांची लाच मागून 1 लाख 25 हजार रुपयांची लाच स्वीकारली. एसीबीचे अधिकारी त्याला रंगेहाथ पकडणार तोच api राहुल देवकर पळून गेला. त्याचा बराच पाठलाग केला असता तो हाती सापडला नाही. ही कारवाई अमरावती एसीबीने शनिवारी सायंकाळी केली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल देवकर हा अकोला जिल्हयातील अकोट शहर पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. ५ एप्रिलला अमरावती एसीबीच्या कार्यालयात तक्रारदाराने तक्रार दिली की त्याचा अकोट येथे अडत व्यवसाय परवाना आहे. त्याच्यावर सह दुय्यम निबंधक अकोट विभागाने कारवाई करून अकोट शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास राहूल देवकर याच्याकडे होता. या गुन्ह्याची चार्जशीट पाठवताना मदत करण्यासाठी व तक्रारदार यांच्या पत्नीचा अटकपूर्व जामीन मंजूर होईपर्यंत त्यांना अटक न करण्यासाठी त्याने दीड लाख रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानुसार लाच घेऊन तो पळून गेला. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला तपास सुरू केला. आहे. यापूर्वी देवकर याने कुणाकडून लाच स्वीकारली का? याचाही तपास करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.