सोलापुरातील अशपाक मौला शेख यास 2 वर्षाकरिता तडीपार
सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून ०२ वर्षाकरिता तडीपार
सोलापूर : घरफोडी चोरी करणे, साथीदारांसह जबरी चोरी करणे, बंद दुकानाचे शटर तोडून चोरी करणे यासारखे गुन्हे दाखल असलेल्या अशपाक मौला शेख, (वय-३२ वर्षे) याला पोलीस आयुक्तालय हद्द, उर्वरित सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्यातून ०२ वर्षाकरिता तडीपार करण्यात आलंय.
अशपाक मौला शेख (रा. घ. नं. १२६०, थोरली इरण्णा वस्ती, कन्नड शाळेजवळ, अण्णासाहेब प्रशालेच्यासमोर, सोलापूर) याच्याविरुध्द सन २०२३ या कालावधीमध्ये घरफोडी चोरी करणे, साथीदारांसह जबरी चोरी करणे, बंद दुकानाचे शटर तोडून चोरी करणे यासारखे काही गुन्हे दाखल दाखल आहेत. त्याच्याविरुध्द सदर बझार पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता.
या प्रस्तावाचे अनुषंगाने पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे यांनी कार्यवाही करुन, त्यांचेकडील तडीपार आदेश क्र. ९०४/२०२४ अन्वये, अशपाक शेख यास सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षाकरिता ०६ एप्रिल रोजीपासून तडीपार केले आहे. त्यास तडीपार केल्यानंतर हडपसर, पुणे येथे सोडण्यात आलेले आहे.