सोलापूर सोशल स्कूल येथील सन 2006 च्या बॅचचा गेट टुगेदर कार्येक्रम संपन्न…

सोलापूर ( प्रतिनिधी ):- 13 एप्रिल 2024 रोजी एसएसए उर्दू हायस्कूलमध्ये सन 2006 च्या बॅचचा गेट टुगेदर आयोजित करण्यात आला होता, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य रसूल चौधरी होते.सर्व सेवानिवृत्त शिक्षक उपस्थित होते.
या प्रसंगी मोहसीन पुणेकर यांनी सोशल हायस्कूलचे प्राचार्य चौधरी सरांचे स्वागत केले.सैफुल्ला कमिशनर यांनी जब्बार सरांचे सत्कार केले,शोएब खैरादी यांनी वासी सरांचा सत्कार केला,अहतेशाम बिद्री यांनी बिद्री सरांचा सत्कार केला.नसिरुद्दीन शेख यांनी यास्मिन मॅडम यांचा सत्कार केला, तोफिक बागवान यांनी कोतवाल सरांचा सत्कार केला, अख्तर इनामदार यांनी शकील सरांचा सत्कार केला, शबनम मॅडम यांचा सत्कार डॉ.परवेज चौकी यांनी केला,इलियास यांनी दिलदार सरांचे सत्कार केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड.जीशान अहमद बक्षी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोहसीन पुणेकर, सैफ कमिशनर, ऍड. झीशान बक्षी, नसिरुद्दीन शेख, सईद बिराजदार आणि अहतेशाम बिद्री यांनी भाग घेतला.



