सोलापूर सामाजिक

‘ तू, कोण आम्हाला सांगणार, डी. जे चे पैसे आम्ही दिले आहे ‘ – 5 जणांवर गुन्हा दाखल

शासकीय कामात अडथळा; ०५ पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

सोलापूर : डी.जे. ऑपरेटरला डॉल्बीचा आवाज कमी करण्याच्या सूचना देत असलेल्या पोलीस शिपायाला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळी-धक्काबुक्की केलीय. ही घटना देगांव रस्त्यावर रविवारी, २१ एप्रिल रोजी सायंकाळी घडलीय. या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार सलगर वस्ती पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी भागवत नागनाथ गायकवाड याच्यासह ५ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलाय.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या मिरवणुका रविवारी, २१ एप्रिल निघाल्या होत्या. देगांव येथील भीम गर्जना बहुउद्देशीय सांस्कृतीक मंडळाची मिरवणूक सायंकाळी निघाली होती. ही मिरवणूक हायवे ने जात असताना, डॉल्बीचा आवाज १०९ डेसिबलपर्यंत वाढविला असता, त्या ऑपरेटरला जवळच सीएनएस हॉस्पीटल असल्याने डॉल्बीचा आवाज कमी कर, असं पोशि जलभीम मल्लेशी कांबळे (नेम- सलगरवस्ती पोलीस ठाणे) यांनी सांगण्याचा प्रयत्न केला.

 

त्यावेळी मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी, ‘ तू, कोण आम्हाला सांगणार, डी. जे चे पैसे आम्ही दिले आहे ‘ असे म्हणून पोलीस शिपाई कांबळे यांना धक्का-बुक्की, शिवीगाळ व दमदाटी करून ते करीत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी पोशि कांबळे यांनी फिर्याद दाखल केली.

त्यानुसार भागवत नागनाथ गायकवाड, सागर भागवत गायकवाड, गोपिचंद तिकुटे, सुमित गायकवाड आणि दिपराज सोनवणे (सर्व रा- सोलापूर) यांच्याविरुद्ध सोमवारी सकाळी भादवि ३५३,५०४,५०६,१८८,३४ पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ चे १५ व ध्वनीप्रदुषण २००० चे कलम ३,४,५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस उपनिरीक्षक पवार या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel