मनोज जरांगे पाटील सोमवारी सोलापुरात..
हॉटस्पॉट..! मनोज जरांगे पाटील सोमवारी सोलापुरात.. सोमवारचा दिवस हा सोलापूरकरांसाठी जाहीर सभांचा हॉटस्पॉट ठरणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा सोमवारी सोलापुरात होत असून यामध्ये मराठ्यांचे नेते मनोज जरांगे पाटील सोलापुरात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.
सोमवारी सायंकाळी ५ वाजता मरीआई चौक येथे मनोज जरांगे पाटील यांचे आगमन होणार असून मराठा समाजाच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे.
स्वागत स्वीकारल्यानंतर मंगळवेढा सांगोला सांगली मार्गे बेळगाव येथे जाहीर सभेसाठी रवाना होणार असल्याची माहिती माऊली पवार, समन्वयक सकल मराठा समाज यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
सोलापुरात मनोज जरांगे पाटलांच्या येण्यामुळे शहर परिसरातील वातावरण ढवळले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकतेच जरांगे पाटील यांनी ज्यांना पाडायचे आहे त्यांना पाडा..! असा संदेश मराठा समाजाला दिलेला होता. सद्यस्थितीत अनेक ठिकाणी गाव भेट आणि संवाद दौरा होत असल्याने मराठा आरक्षण आंदोलन चळवळ जिवंत ठेवण्याचे काम जरांगे पाटील यांच्या दौऱ्यामुळे होत आहे अशी प्रतिक्रिया मराठा समाजाकडून व्यक्त केली जात आहे.