राजकीयमहाराष्ट्रलोकसभा बातमी 2024

एकता स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशनच्या वतीने कोंढव्यात मतदान जनजागृती मोहिम

पुणे : कोंढवा येथील ‘एकता स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन पुणे या संस्थेतर्फे कोंढवा व परिसरात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान जनजागृती मोहिम राबविण्यात आली. प्रत्येकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा व लोकशाही मजबूत करावी, हा या मोहिमे पाठीमागील हेतू असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मुजाहिद रायली सर यांनी सांगितले.
शुक्रवार दि- 03/04/2024 रोजी दुपारची नमाज पठण झाल्यानंतर कौसरबाग मस्जिद समोर एकता स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन कोंढवा पुणे यांच्या वतीने मतदान जनजागृती अभियान मोहीम राबवण्यात आली. एकता स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन कोंढवा पुणेचे संस्थापक अध्यक्ष मुजाहिद रायली सर यांनी लोकांना १००% मतदान करण्याची विनंती केली. नमाज पठणासाठी आलेल्या अनेक लोकांचा मोहिमेला प्रतिसाद मिळाला.
दि – 04/04/2024 वार शनिवार रोजी ज्योती हॉटेल चौक, एन. आय. बी. एम. रोड, कोंढवा येथे सायंकाळी ठीक 5 ते 6:30 या वेळेत मतदान जनजागृती मोहीम संस्थेतर्फे राबवण्यात आली. यावेळी सुद्धा नागरिकांचा चांगला प्रतिसाद मोहिमेला मिळाला. या मतदान जनजागृती मोहिमेमध्ये एकता स्पोर्ट्स सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.
अफ्फान भाई शेख, शफी अंबिलखीचडे सर, फारूक सर, जुबेर भाई ( तूबा कुल्सुम चैरमेन),इरफान भाई नदाफ, असद भाई शेख, अय्युब भाई खान, खालिद भाई शेख, बब्बु भाई रायली, अब्दुर रझाक भाई( आय टी मॅनेजर), सैफुल्लाह भाई, (आय टी मॅनेजर), मुस्तफा भाई, शाहिद शेख, अर्शद पीरजादे , मुबीन बागवान, अन्फाल सर, निसार भाई, दशरथ भाई, डॉ. उबेद सर, व मोईन भाई जकलेर व इतर सदस्य मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel